काही फीचर्स फुकट मिळतात म्हणून आपण विचार न करता apk वापरता असतो.

पण आजच्या या काळात आपण विसरलं नाही पाहिजे की जर काही मोफत मिळत असेल तर आपल्याकडून ते काही तरी घेत असतात.

com.Base.media.service com.moves.media.tubes com.videos.watchs.share

;हे ते apps आहेत जे पाकिस्तानी हॅकरने बनवले आहेत.

CapraRAT हा वायरस त्या apps मध्ये आहे. याच्या मदतीने त्यांच्याकडे तुमची खूप काही माहिती जाते.

मायक्रोफोन आणि तुमचे दोन्ही कॅमेऱ्यांचा अॅक्सेस त्यांच्याकडे जातो.

ते तुमच्या मोबाईल वरील एसएमएस पण वाचू शकतात आणि कॉन्टॅक्ट्स पण.

मोबाईल वरून एसएमएस पाठवू पण शकतात आणि एसएमएस ब्लॉक पण करू शकतात.

तुमच्या नकळत एखाद्याला फोन पण लावू शकतात.

मोबाईलचे स्क्रीनशॉट पण काढू शकतात.

तुमचं जीपीएस पण ते अॅक्सेस करू शकतात.

मोबाईल मधील फाईल मॉडीफाय करू शकतात.