चंद्रयान ३ हे आज २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.

संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान उतरवले जाणार आहे. 

याचं थेट प्रक्षेपण तुम्ही इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर किंवा दूरदर्शन वर बघू शकता. 

भारताचा हा दूसरा प्रयत्न ठरणार आहे. 

चंद्रयान २ चंद्रावर उतरू शकले नाही शेवटच्या क्षणी त्याच्याशी संपर्क तुटला होता.  

याचा अर्थ असा नाही की ती मोहीम अयशस्वी ठरली

ती मोहीम अंशतः अयशस्वी झाली होती. 

त्याती ऑर्बीटर पण होता जो यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहोचला होता. 

चंद्रयान ३ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. 

याआधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न रशियाच्या लुना २५ या यानान केला होता. 

पण दुर्दैवाने ते यान चंद्रावर कोसळले. 

त्यामुळे आता भारताकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश म्हणून ही  संधी आहे. 

इस्रोच्या शास्त्रज्ञानी असेही सांगितले आहे की जर काही अडचण आलीच तर लँड करण्याची तारीख आणि वेळ ही बदलली जाऊ शकते. 

ही तारीख २७ ऑगस्ट पर्यंत बदलली जाऊ शकते.