चंद्रयान ३ | Chandrayaan 3

google-news-icon

पूर्वार्ध

चंद्रयान १

या आधी चंद्रावर खूप देशांनी स्वाऱ्या केल्या त्यात भारतानेही २००८ साली पहिले भारतीय यान चंद्रावर पाठवून या देशांच्या यादीत सामील झाला. चंद्रयान १ ने चंद्रावर पाणी आहे हा शोध लावला. याने जगभरात भारताचा दबदबा निर्माण झाला होता. शिवाय हे भारताचं पहिलेच पृथ्वीबाहेरील प्रक्षेपण होतं.

चंद्रयान २

त्यानंतर भारताने मंगळयान पाठवले. मंगळयान मध्येही भारताला खूप यश प्राप्त झाले. पहिल्याच प्रयत्नात मंगळवर ग्रह पाठवणारा भारत पहिलं देश ठरला. आता २०१९ साली परत चंद्रावर जाण्याच भारताने ठरवलं. यावेळी नवे आव्हान घेतले होते ते म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर एक रोव्हर पाठवण्याचा. या रोव्हरची सॉफ्ट लॅंडींग करायची हे त्यातलं खूप मोठं आव्हान होतं. पहिल्याच प्रयत्नात असे खूप कमी देश करू शकलेत. पण शेवटचे अडीच किलोमीटर लॅंडींगसाठी बाकी असताना भारताचा लँडरशी संपर्क तुटला अन् भारताचं हे स्वप्न ही तुटलं. इथे खूप लोकं असे म्हणू लागले की ही मोहीम अयशस्वी ठरली पण असे नव्हते ही ९५ टक्के यशस्वी मोहीम होती. यात फक्त चंद्रावरील लॅंडींग झाली नव्हती नाहीतरी भारताचा चंद्राभोवती ऑर्बीटर फिरतच होता.

चंद्रयान ३

मागच्या मोहिमेत भारताला अंशतः अपयश आलं होतं पण यावेळी भारत मागच्या चुकीतून शिकवण घेऊन यावेळी मोहीम पूर्णतः यशस्वी करायच्या तयारीत आहे. चंद्रयान २ मध्ये तीन टप्पे होते. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर होते. तर चंद्रयान ३ मध्ये दोनच टप्पे असतील. यावेळी ऑर्बिटर नसणार आहे. लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल:-लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचवण्याचं काम करेल. सध्या चंद्रयान ३ च्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. यासंबंधीच्या सर्व चाचण्या मार्चमध्येच झाल्या आहेत.

GSLV MARK 3 द्वारे याचं प्रक्षेपण १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा इथून केलं जाईल. चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे, भूकंपाच्या हालचाली वर लक्ष ठेवणे अशा अनेक गोष्टी अभ्यासल्या जाणार आहेत. यावेळी चंद्रावर in-situ रासायनिक परीक्षण केले जाणार आहेत. in-situ म्हणजे चंद्राच्याच जमिनीवर हे परीक्षण केले जाणार आहेत. यासाठी नमुने पृथ्वीवर आणण्याची गरज नाही.

लँडर वरील उपकरणे (Lander payloads): 

Chandra’s Surface Thermophysical Experiment (ChaSTE)- तापमान आणि औष्णिक वाहकता मोजण्यासाठी; Instrument for Lunar Seismic Activity (ILSA) जिथे यानाला उतरवायचे आहे तिथली भूकंपाची वारंवारिता मोजण्यासाठीचं यंत्र; Langmuir Probe (LP) प्लाजमा ची घनता आणि त्याचे वैविध्य जाणून घेण्यासाठी. यात नासाद्वारे पण एक उपकरण पाठवले जात आहे.

रोव्हर वरील उपकरणे Rover payloads: 

Alpha Particle X-ray Spectrometer (APXS) and Laser Induced Breakdown Spectroscope (LIBS) for deriving the elemental composition in the vicinity of landing site.

तंत्रज्ञान

चंद्रावर हे सर्व प्रयोग करण्यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर केला आहे

  1. Altimeters: Laser & RF based Altimeters
  2. Velocimeters: Laser Doppler Velocimeter & Lander Horizontal Velocity Camera
  3. Inertial Measurement: Laser Gyro based Inertial referencing and Accelerometer package
  4. Propulsion System: 800N Throttleable Liquid Engines, 58N attitude thrusters & Throttleable Engine Control Electronics
  5. Navigation, Guidance & Control (NGC): Powered Descent Trajectory design and associate software elements
  6. Hazard Detection and Avoidance: Lander Hazard Detection & Avoidance Camera and Processing Algorithm
  7. Landing Leg Mechanism.

संदर्भ व चित्र : इस्रो संकेतस्थळ

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवाराला नक्की कळवा. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेन्ट करा. शिवाय या वेबसाइट खूप माहिती आहे आणि येणार आहे त्यामुळे याला सोशल मीडिया वर फॉलो पण करा. इथपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!

हेही वाचा: मोबाईल अॅंटीवायरस

प्रश्नोत्तरे

चंद्रयान ३ चे प्रक्षेपण कधी होणार आहे?

१४ जुलै (तारीख बदलण्याची शक्यता आहे) २०२३ रोजी याचे प्रक्षेपण होणार आहे

चंद्र एवढा का महत्वाचा आहे?

चंद्रावर एक हीलियम ion सापडतं. जे की एक नैसर्गिक वायु आहे. यामुळेच सर्व देश चंद्रावर आपले मोहीम काढतात जेणेकरून त्यांना याच्याबद्दल जास्त माहीत होईल.

चंद्रयानाचे प्रक्षेपण कुठून होणार आहे?

याचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा इथून होणार आहे.

Leave a Comment