गोपाळ गणेश आगरकर माहिती | Gopal Ganesh Agarkar Information in Marathi
गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिवादाच्या आधारावर समाजसुधारणेचा पुरस्कार करणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १४ जुलै, १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला. त्यांच्या वडिलांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. या परिस्थितीचे चटके त्यांना लहान वयातही बसले होते.