लोकमान्य टिळक संपूर्ण माहिती मराठीत | Lokmanya Tilak Information in Marathi

लोकमान्य टिळक यांची माहिती मराठीत

लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी गटाचे प्रमुख नेते होते. हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते किंवा सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. ‘हिंदी असंतोषाचे जनक’ म्हणूनही त्यांना संबोधण्यात आले होते.