संत गाडगेबाबा माहिती मराठी | Sant Gadgebaba Information in Marathi

राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज

गाडगेबाबा हे समाजसुधारणेचा ध्यास घेतलेले आणि समाजसेवेचे व्रत स्वीकारून त्यासाठी अविरत झटलेले आधुनिक काळातील महान संत होत. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव येथे एका सामान्य परीट जातीच्या कुटुंबात झाला.