राशी माहिती मराठी| 12 Zodiac Signs

google-news-icon

नमस्कार मित्रांनो राशी हा शब्द तुम्ही अनेकदा कोणत्यातरी कारणाने ऐकलाच असेल. मग खगोलशास्त्रात असेल किंवा मग ज्योतिषशास्त्रात असेल. दोन्हीकडे याचा वापर वेगळा. पण आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की यचा वापर खगोलशास्त्रात काय आहे. या राशी कोणत्या आहेत.

व्याखा

तुम्ही एक निरीक्षण करून पहा सूर्य आणि चंद्र हे तुम्हाला दररोज एकाच मार्गावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतील. या मार्गाला खगोलीय भाषेत आयनिक वृत्त असे म्हणतात. आणि याच आयनिक वृत्तावर तुम्हाला काही तारकासमूह दिसतील. यांनाच राशी असे म्हणतात.

आपण जे आकाश पाहतो त्याला जर कोणा मध्ये मोजलं तर ते १८० अंश असतं. सूर्याचा जो मार्ग आहे तो पण १८० अंशच आहे. या मार्गावर १२ तारकासमुह येतात. त्यांना समान विभागलं तर प्रत्येक रास ही ३० अंशाची होते. जर याची विभागणी वेळेत केली तर १ अंश उगवण्यासाठी ४ मिनिटे लागतात. त्यामुळे पूर्ण रास उगवण्यासाठी २ तासांचा कालावधी लागतो. शिवाय पृथ्वी फिरत असल्याने कोणतीही रास किंवा तारकासमुह ४ मिनिटे लवकर उगवते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक महिन्याला नवीन रास आणि तारकासमूह क्षितिजावरून उगवताना दिसतात.

या राशींचा उगम हा भारतातला नाहीये. याची मुळे आपल्याला ग्रीक संस्कृतीत मिळतात. ग्रीक लोकांनी ज्या प्राण्यांची कल्पना केली आहे ते फक्त ग्रीक संस्कृतीतच आढळतात. यातील काहीच तुम्हाला भारतीय संस्कृतीत दिसतील. शिवाय कोणत्याही राशीचा उल्लेख भारतीय पुराणांमध्ये मिळत नाही. भारतीयांची नक्षत्र ही संकल्पना आहे. याचे उल्लेख जास्तीत जास्त पुराणांमध्ये मिळून जाईल. जसे रामायण, महाभारत इ.

राशींची नावे

  • मेष-एप्रिल
  • वृषभ-मे
  • मिथुन-जून
  • कर्क-जुलै
  • सिंह-ऑगस्ट
  • कन्या-सप्टेंबर
  • तूळ-ऑक्टोबर
  • वृश्चिक-नोव्हेंबर
  • धनु-डिसेंबर
  • मकर-जानेवारी
  • कुंभ-फेब्रुवारी
  • मीन-मार्च

ही या राशींची नावे आहेत. मी राशींसमोर महिन्यांची नावे पण लिहिली आहेत. तुम्ही म्हणाल याचा काय संबंध आहे? तर सांगतो पुढे वाचा. तुम्ही एक सण दरवर्षी साजरा करता. तो म्हणजे मकर संक्रांत. यातील संक्रांत हा संक्रमण या शब्दाचा अपभ्रंश आहे. या संक्रमण शब्दाचा अर्थ होतो प्रवेश करणे. तर मकर संक्रांत या शब्दाचा अर्थ होतो मकर राशीत प्रवेश करणे. आपण हा सण का साजरा करतो ते मी पुढे सांगेन तिथपर्यंत नक्की वाचा तोपर्यंत बाकी राशींबद्दल जाणून घेऊयात त्याच्या मागील काय गोष्टी आहेत ते.

मेष

ही गोष्ट एका सोनेरी लोकर असणाऱ्या मेंढ्याबाबत आहे. याचं नाव रॅम असे होते. कथेनुसार हा मेंढा दोघाजनांना एक सुरक्षित ठिकाणी नेतो. पण त्यातील एक जण त्या मेंढ्याचाच बळी देवांना देतो. त्यामुळे याचं लोकर एक खजिनाच होऊन जातो.

mesh aeries मेष

ही रास तुम्हाला सप्टेंबरपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल. भारतीय संकल्पनेतील नक्षत्र जे आहेत त्यातील दोन नक्षत्र या राशीत आढळतात. त्यांची नावे आहेत अश्विनी आणि भरणी.

वृषभ

वृषभ हा एक संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ होतो बैल. याच्या गोष्टीनुसार ग्रीक देवांचा राजा झूस असतो. एका सुंदर मुलीवर त्याचा जीव जाडतो. त्या मुलीचं नाव असतं युरोपा. तर तिला प्रभावित करण्यासाठी हा देवांचा राजा एक सुंदर अशा पांढऱ्या बैलाचं रूप घेतो. मग युरोपा त्या बैलाच्या पाठीवर बसून समुद्र पाहण्यासाठी जायचे.

वृषभ  taurus vrushabh

ही रास तुम्हाला ऑक्टोबरपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल. यामध्ये दोन नक्षत्र आहे रोहिणी आणि कृत्तिका. शिवाय यातील कृत्तिका हे एक तारकागुच्छ आहे. सोबतच यात एक तेजोमेघ पण आहे. ज्याला क्रॅब नेब्यूला पण म्हणतात.

मिथुन

मिथुन या शब्दाचा अर्थ हा जोडी असा होतो. या राशीत ग्रीक पुराणकथेनुसार दोन भावांची जोडी आहे. त्यांची नावे आहेत कॅस्टॉर आणि पोलक्स. या दोन भावांमध्ये खूप प्रेम असते शिवाय ते दोघेही खूप शूर असतात. त्यांच्यापैकी कॅस्टॉरचा मृत्यू होतो. या घटनेने पोलक्स खूप व्याकुळ होतो. याचं दुख: तो पचवू शकत नाही. हे पाहू झूस त्या दोघांना आकाशात या तारकासमूहाचं रूप देतो.

मिथुन mithun gemini

या राशीत तीन नक्षत्रांचा समावेश आहे. मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू. नोव्हेंबरपासून ही रास रात्री आकाशात दिसू लागते. पाहण्यात ही खूप छान दिसते.

कर्क

तुम्ही कदाचित हर्क्युलस हे नाव नक्कीच ऐकलं असेलच. यामध्ये याला बारा अवघड कामे दिली असतात. त्यापैकी एक काम म्हणजे हायड्रा नावाच्या सापाला हरवणे असतं. त्यावेळी हेरा नावाची देवी त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी या खेकड्याला पाठवते. हा खेकडा आकाराने खूप मोठा असतो. पण तरी हर्क्युलस त्याला हरवतो. त्याला हरवल्या नंतर हेरा नावाची देवी त्या खेकड्याला आकाशात पाठवते.

कर्क cancer kark

कर्क या शब्दाचा अर्थ खेकडा असा होतो. या राशीत दोन नक्षत्र आहेत. पुष्य आणि आश्लेषा. यातील पुष्य हे तारकागुच्छ आहे. पण या राशितील तारे खूपच अंधुक आहेत. त्यामुळे हे तारकागुच्छ पण खूप अंधुक आहे. डिसेंबरपासून पुढील सहा महीने ही रास दिसते.

सिंह

या राशीला लिओ असेही संबोधतात. याच्या गोष्टीनुसार हा सिंह नेमिया या भागात राहायचा. याच्या मानेवारील सोनेरी आयाळामुळे हा सिंह अजेय असतो. मग याला हरवण्यासाठी हर्क्युलसला पाठवतात. हर्क्युलस या सिंहाला हरवतो. अन् आकाशात भिरकवतो. याचं तारकासमूहात रूपांतर होतं.

सिंह , leo , sinh

जानेवारीपासून पुढे सहा महीने ही रास रात्रीच्या आकाशात दिसते. ही रास पण दिसण्यात खूप मनमोहक आहे. या राशीत तीन नक्षत्र आहेत. मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी.

कन्या

ग्रीक पुराणानुसार व्हर्गो(कन्या) ही पवित्रतेची देवता असते. सुवर्ण काळात पृथ्वीला सोडणारी ही शेवटची अमर देवता असते. तिचा सन्मान म्हणून झूस हिला आकाशात स्थान देतो.

कन्या, kanya, virgo

फेब्रुवारीपासून ही रास तुम्हाला आकाशात दिसू लागते. या राशीत तीन नक्षत्रांचा समावेश आहे. हस्त, चित्रा आणि स्वाती. आकाशात याचा आकार हा एका कन्येसारखा दिसतो.

तूळ

या राशीला लिब्रा असेही म्हणतात. ग्रीक संस्कृतीत हिला न्यायदेवता मानतात. आकाशात या समूहाचा आकार हा एका तराजू सारखा दिसतो.

तूळ , tula, libra

मार्चपासून ही रास दिसू लागते. यात एका नक्षत्राचा समावेश आहे. त्याचं नाव आहे विशाखा.

वृश्चिक

ग्रीक कथेनुसार ही गोष्ट एका शिकाऱ्याची आणि एका विंचवाची आहे. या गोष्टीत ओरायन नावाचा शिकारी असतो. याला स्वत:च्या शिकार करण्याच्या कौशल्यावर खूप गर्व होतो. मग याला हरवण्यासाठी ग्रीक पुराणनुसार पृथ्वीदेवता गैगा हा विंचू पाठवते. मग हे दोघेही तारकासमूहाच्या रूपात एका काळचक्रामध्ये अडकतात. अन् एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

वृश्चिक , scorpio, vrushchik

तुम्ही जर निरीक्षण केले तर हे वृश्चिक आणि ओरायन म्हणजेच आपलं मृग तारकासमूह हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेस आहेत. ही रास बाकी राशींपैकी दिसण्यात सर्वात देखणी आहे. यातील तारे हे खूप तेजस्वी आहेत. या समूहाचा हृदयाच्या ठिकाणी एक लाल तारा आहे त्याचं नाव आहे ज्येष्ठा(antares) आहे. या ताऱ्याला प्रतिमंगळ पण म्हणतात. कारण हा तारा मंगळाएवढाच लाल दिसतो. यात तीन नक्षत्र आहे. अनुराधा, ज्येष्ठा आणि मुळा. ही रास एप्रिलपासून दिसू लागते.

धनु

ग्रीक कथेनुसार या समूहाला सॅजिटॅरस असे नाव आहे. यांच्या मान्यतेनुसार सॅजिटॅरस असा प्राणी आहे ज्याचं वरचं अर्ध शरीर हे माणसांचे आणि खालच अर्ध शरीर हे घोड्याचं असतं. यातील प्राणी हा चिरोन नावाचा सॅजिटॅरस आहे. याच्यात धनुष्य चालवण्याची कमालीची कला असते. याने हर्क्युलस आणि जेसन अशा योध्यांना ही कला शिकवलेली असते. अशी काहीशी या तारकासमूहाची ही गोष्ट आहे.

धनु , dhan , saggitarus

या राशीत दोन नक्षत्र आहे. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. शिवाय या राशीच्या दिशेत आपल्या आकाशगंगेचं केंद्र पण आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा या राशीकडे पाहत असाल तेव्हा तुम्ही आपल्या आकाशगंगेच्या केंद्राकडे पाहत असता. मेपासून ही रास दिसू लागते.

मकर

या तारकासमूहाची गोष्ट ही एका मेंढपाळाच्या देवाची आहे. जो की टायफोन नावाच्या राक्षसापासून वाचण्यासाठी अर्धा बोकड आणि अर्धा मासा बनून समुद्रात जातो. यामुळे त्याला या तारकासमूहाचं स्थान दिले गेले आहे.

या तारकासमूहात दोन नक्षत्र आहेत एक म्हणजे धनिष्ठा आणि दुसरे श्रवण. जून पासून ही रास दिसू लागते. पण यातील तारे पण खूप अंधुक आहेत त्यामुळे ही रास पावसाळ्यात दिसणे खूप कठीण आहे. वर सांगितल्याप्रमाणे आपण मकर संक्रांत साजरी करतो. याचं कारण म्हणजे ज्यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी हवामानात बदल होण्यास सुरू होते. या काळात थंडी पण खूप असते त्यामुळेच आपण या सणाला तीळ आणि गूळ यांच्यासारखे ऊब देणारे पदार्थ खातो.

या सणाची तारीख बदलत राहते. काही वर्षांनी हा सण १५ जानेवारीला साजरा होण्यास सुरुवात होईल. आधी पाहायचं झालं तर १७ व्या शतकात म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या काळात याची तारीख ही ८ किंवा ९ जानेवारी असावी. दर ७२ वर्षांनी ही तारीख बदलत असते. सूर्यचं मकर राशीत संक्रमण आणि हवामानात बदल यामुळेच हा पर्व साजरा केला जातो. त्यामुळेच हा सण आपण तिथीनुसार नाही तर तारखेनुसारच साजरा करतो.

कुंभ

यात एक पाणी वाहून नेणाऱ्याची आकृती आहे. या कथेनुसार गॅनिमिड नावाच्या व्यक्तीच्या सौंदर्य पाहून झूस त्याच्यावर राग धरून असतो. त्यामुळे तो त्याला एका गरुड पक्षी मध्ये रूपांतरित करतो. आणि त्याला देवाचं मद्य वाढण्याचं काम देतो. या तारकासमूहात एकच नक्षत्र आहे ते म्हणजे शततारका.

मीन

मीन मध्ये दोन मासे आहेत जे एकमेकांना दोरीने जोडलेले आहेत. ग्रीक कथेनुसार एरोस आणि आफ्रोडाइट यांना टायफोन नावाच्या राक्षसाने कैद केले असते. याच्या तावडीतून सुटण्यासाठी हे दोघे माशांचं रूप घेतात आणि नदीतून पोहत जातात.

ही रास आकाराने खूप मोठी आहे. या राशीत तीन नक्षत्र आहेत. पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती. यातील तारे फारसे ठळक नाहीत त्यामुळे याला पाहणीसाठी डोळ्यांची कसरत करावी लागते.


google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

अवकाशवेध

ही मराठीतली पहिली खगोलशास्त्रावरची वेबसाइट आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या.

प्रश्नोत्तरे

एकूण राशी किती आहेत?

१२ आहेत.

राशींची नावे कोणती आहेत?

मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनू मकर कुंभ मीन

एकूण नक्षत्रे किती आहेत?

एकूण २७ नक्षत्रे आहेत.

रास म्हणजे काय?

सूर्य आणि चंद्रचं जे भासमान मार्ग आहे त्याला आयनिक वृत्त असे म्हणतात. या वृत्तावर १२ तारकासमूह आहेत त्यांनाच रास किंवा राशी असे म्हणतात.

Leave a Comment