गंगा ही मोठी नदी आणि आकाशगंगा म्हणजे अवकाशातील ताऱ्यांची नदी असेच तिचे नाव आहे. आकाशगंगा याला दीर्घिका हा समानार्थी शब्द आहे. आपल्या आकाशगंगेचं नाव मंदाकिनी आकाशगंगा आहे. इंग्रजीत तिला ‘ मिल्की वे’ असं म्हणतात. कारण रात्रीच्या आकाशात तिचा दुधेरी रंगाचा फिकट असा पट्टा पृथ्वीवरून तुटक दिसतो. त्यामुळे तिला ‘ मिल्की वे’ असं म्हणतात. कारण ती एक सर्पिल भुजांची आकाशगंगा आहे. आपल्याला देवयानी नावाची एक सर्वसामान्य सर्पिल आकाशगंगा सर्वात जवळ आहे.
आपल्या भारतीय पुराणात पण आकाशगंगेचा गंगा नदीशी संबंध आहे. जर माहीत असेल तर गंगेचं भगीरथी असेही नाव आहे. ते भगीरथ या व्यक्तीच्या नावाने आहे. त्याच्या पूर्वजांना मोक्ष मिळवण्यासाठी त्याने खूप तपश्चर्या केली होती. त्यावेळी गंगा नदी अवकाशातून पृथ्वीवर आधी महादेवच्या जटेत अन् मग पृथ्वीवर अवतरली होती. आधी गंगा नदी आकाशात होती म्हणून तिला आकाशगंगा असे म्हणायचे. त्या आकाशगंगेचा उगम हा विष्णूच्या पायतून होतो अन् तिचा वेग खूप जास्त होता त्यामुळे तिचा वेग कमी करण्यासाठी महादेवाने गंगेला जटेत धारण केले होते.
मुद्दे
मंदाकिनी आकाशगंगाचा विस्तार : Milky way Expansion
आपली मंदाकिनी आकाशगंगा ही एक सर्वसामान्य आकाशगंगा आहे. या आकाशगंगेत अंदाजे २०० अब्ज तारे आहेत. मंदिकीनीचा व्यास अंदाजे एक लाख प्रकाशवर्ष आहे. तिची जाडी २००० प्रकाशवर्षांची आहे. जी की व्यासापेक्षा बरीच कमी आहे. म्हणून ती तबकडी जरा पातळच म्हणायची. आपला सूर्य आकाशगंगेच्या मध्यापासून साधारण २६,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे म्हणजे काही विशेष जागी नाही.
आकाशगंगेच्या मध्यवर्ती फुगवट्याचा व्यास १५-२० हजार प्रकाशवर्षे आहे व केंद्रापाशी आकाशगंगेची रुंदी सुमारे १०,००० प्रकाशवर्ष असावी. या केंद्रभागात ताऱ्यांची संख्या प्रचंड आहे.केंद्रीय फुगवटा व मध्यवर्ती तबकडी यांच्या सभोवती एक प्रभामंडल आहे. या प्रभामंडलाचा व्यास ६५,०००० प्रकाशवर्षे असावा आणि त्यामधील वस्तुमान १-२ खर्व, ४० अब्ज सूर्यांइतके असावे असा अंदाज आहे.

Milky Way: मंदाकिनी आकाशगंगा बाहेरील आवरण
प्रभामंडलाच्या बाहेर करोना नावाचे आवरण आहे. त्यामधील वस्तुमान १-२ निखर्व सूर्यांइतके प्रचंड असले पाहिजे. आकाशगंगेच्या केंद्रापासून करोनाचा विस्तार. किमान २ लक्ष प्रकाशवर्ष अंतरापर्यंत किंवा कदाचित ३.५ लक्ष प्रकाशवर्षापर्यंत पसरलेला असेल. छोटा आणि मोठा मॅगेलानिकमेघ, सात खुज्या आकाशगंगा, किमान 11 तारकागुच्छ या सर्व गोष्टी करोनाचेच घटक आहेत. आपली आकाशगंगा ही अशी अतिविशाल आहे. गोलाकार तारकापुंज आकाशगंगेच्या सभोवारच्या तेजोवलयात सर्व दिशांना साधारण सम प्रमाणात पसरले आहेत. हे सगळे झाले आकाशगंगेतील दृश्य द्रव्य.
Milky Way: मंदाकिनी आकाशगंगा गती
अशी विशाल असलेली ही स्वत:भोवती सरासरी २७६ किमी प्रति सेकंद गतीने फिरते. या गतीने फिरत ती स्वत:भोवती २०-२५ कोटी वर्षात एक फेरी पूर्ण करते. निर्मितीपासून आतापर्यंत मंदाकिनी आकाशगंगेने स्वतःभोवती साधारणतः ५४-६८ फेऱ्या पूर्ण केल्या असाव्यात.
Milky Way: मंदाकिनी आकाशगंगा केंद्र
रात्रीच्या आकाशात जेव्हा आपण धनु रास पाहत असतो तेव्हा आपण आपल्या आकाशगंगेच्या केंद्राकडे पाहत असतो. म्हणजेच आपल्या आकाशगंगेच्या केंद्राच्या पार्श्वभूमीवर धनू रास आहे. आपण धनु राशीकडे पाहिले असता आपल्याला केंद्र दिसत नाही आपण फक्त रोखाने पाहत असतो. आकाशगंगेचा गाभा आपल्यापासून २६,००० प्रकाशवर्षे दूर आहे. या गाभ्याच्या मध्याभोवती एक गोल घुमटाकार आभा दिसतो, ज्यात सुमारे १५० बंदिस्त तारकागुच्छ किमान ११-१४ अब्ज वयाचे दहा लाख तारे दाटीवाटीने वसलेले दिसतात. मंदाकिनी आकाशगंगेच्या मध्याभोवती वर आणि खाली फुगवटा असल्यासारखी ही घुमटाकार आभा सुमारे ५०,००० हजार प्रकाशवर्ष व्यासाची आहे.
आपण जेव्हा आकाशगंगेच्या केंद्राकडे पाहतो तेव्हा त्या मार्गाच्या मध्ये वायूंच्या ढगांमुळे आणि आंतरतारकीय धुळीचा अडथळा आल्यामुळे दृश्य प्रकारच्या माध्यमामधून आपल्याला केंद्र दिसू शकत नाही; पण रेडीओ लहरींच्या माध्यमातून या गाभ्याचा काही प्रमाणात वेध घेता येतो. निरीक्षणातून कळले आहे की, आपल्या आकाशगंगेच्या केंद्रबिंदुपाशी अनेक लहान खगोलीय वस्तूचा समूह आहे. या समुहाला ‘धनु अ’ असे म्हणतात. यातील एक वस्तू दिर्घिकेच्या परिवलनाच्या केंद्राच्या अगदी जवळ दिसून येते. या भागातून अतिशय प्रखर आणि मोठ्या प्रमाणात ‘क्ष किरण’ प्रारणे उत्सर्जित होतात असे आढळले आहे.
मंदाकिनी आकाशगंगेच्या केंद्राशी कृष्णविवर : Black Hole at centre of Milky Way
आकाशगंगेच्या केंद्रापासून येणारी क्ष किरणांची प्रारणे आणि त्याच्या समीप असणाऱ्या ताऱ्याच्या हालचालींच्या निरीक्षणावरून या भागाची व्याप्ती जेमतेम सूर्यमालेएवढीच आहे; परंतु त्यांच्या केंद्राशी एक प्रचंड वस्तुमानाचे ‘कृष्णविवर’ असावे असे खगोलशास्त्रज्ञ मानतात. या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या दहा लाख पटींहुन अधिक असावे असा अंदाज आहे. काही निरीक्षणामधून तर असे दिसून आले आहे की सूर्याच्या वस्तुमानाएवढी अनेक कृष्णविवरे या मुख्य कृष्णविवराभोवती, आकाशगंगेच्या केंद्राभोवती घोंघावत आहेत. जणू दिव्याभोवती जमलेल्या प्रतंगाप्रमाणे ! न दिसाणाऱ्या महाकाय कृष्णविवराच्या काल्पनिक दिव्याभोवती घोंघावणारी तशीच न दिसणारी अनेक कृष्णविवरांची काल्पनिक पाखरे !
आकाशगंगेची माहिती आणि त्यांचे प्रकार हेही वाचा
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!
प्रश्नोत्तरे
-
आकाशगंगा म्हणजे काय?
आकाशगंगा म्हणजे तेजोमेघ, तारे, लघुग्रह, ग्रह, कृष्णविवर यांचा संग्रह होय.
-
आपल्या आकाशगंगेचं नाव काय?
मंदाकिनी हे आपल्या आकाशगंगेचं नाव आहे.
-
मंदाकिनी आकाशगंगेत तारे किती आहेत?
सुमारे २००-२५० अब्ज तारे असावेत.
-
आपल्या आकाशगंगेचा व्यास किती आहे?
सुमारे एक लाख प्रकाशवर्षे.