आकाशगंगांचे प्रकार आणि त्यांची सविस्तर माहिती | Types Of Galaxies and Information In Marathi

google-news-icon

अनेक आकाशगंगांचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की, त्यांचे आकार, घाट, तेजस्विता व इतर गुणधर्म विविध प्रकारचे असतात. प्रत्येक दीर्घिका (Galaxy) तपशिलात तपासली की इतरांपेक्षा वेगळी दिसते. पण एक ढोबळ प्रतवारी करुन या दीर्घिका (Galaxy) विविध वर्गात विभागल्या जातात. अगदी साध्या प्रकाराने त्यांचे काही भाग पडतात. 1) दिर्घवर्तुळाकृती  2) सर्पिल 3) भिंगाकार 4) अनियमित

दिर्घवर्तुळाकृती आकाशगंगा

या आकाशगंगांच्या प्रतिमा दीर्घवर्तुळाकार असतात आणि त्या सलग, गुळगुळीत कडांच्या, कुठे कंगोरे न दिसणाऱ्या असतात. काही लक्षावधी दीर्घवर्तुळाकार आकाशगंगांमध्ये तेथील धुळीमुळे तयार झालेले चट्टे दिसतात, तर थोड्या दीर्घिका (Galaxy) लक्षवेधक असून त्यांत रेडिओलहरींचे स्रोत असतात व ते रेडिओ दुर्बिणीतून तपासता येतात.

बऱ्याच दीर्घवर्तुळाकार आकाशगंगांना हा वेधक प्रकाश नसतो, पण अति सामर्थ्यवान उपकरणांनी बारकाईने तपासले, तर धुळीने तयार झालेले अगदी फिकट पट्टे आणि आणखीही काही वैशिष्टये दिसू शकतात. या विविध गोष्टींवरून आकाशगंगांची (Galaxy) उत्पत्ती व उत्क्रांती यासंबंधी माहिती मिळते.

दिर्घवर्तुळाकार  आकाशगंगा

दीर्घवर्तुळाकार आकाशगंगांमध्ये तेजस्वितेचे अनेक प्रकार आहेत. आपल्या आकाशगंगेच्या अल्प हिश्शापासून ते आपल्या आकाशगंगेच्या हजारो पट तेजस्विता असलेल्या दीर्घिका आहेत. सर्वांत तेजस्वी दीर्घिका CD प्रकारच्या आहेत, त्यांचा पसारा प्रकाशवर्षएवढा मोठा आहे.

काही दीर्घवर्तुळाकार दीर्घिका (Galaxy) विश्वाची उत्पती झाल्यावर लवकरच बनल्या असाव्यात, तर काही बऱ्याच उशिराने इतर प्रकारच्या दीर्घिकांमधून देवाणघेवाण घेऊन बनल्या असाव्यात असे, अभ्यासकांचे मत आहे. दीर्घवर्तुळाकार दीर्घिका व्यवस्थित घडली की, मग तिच्यात कमी तापमानाचे वायू उरलेले नसतात आणि नव्या तारकांची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे अशा दीर्घिकातील तारे बहुतांश जुने असतात.

दीर्घिका (Galaxy) घडत असताना प्रचंड उत्पात होतात. त्यावेळी किंवा भरपूर वायू असणाऱ्या दुसऱ्या आकाशगंगांशी टक्कर झाल्यामुळे दीर्घवर्तुळाकार दीर्घिका बनू शकतात. दीर्घवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये भरपूर गोलाकार तारकापुंज सापडतात आणि ह्या आकाशगंगांच्या भोवताली तेजोवलय( halo) असते ज्यामुळे त्या दूर अंतरापर्यंत पसरलेल्या असतात. त्यांत असे तारकापुंज तसेच जुने तारेही असतात.

सर्पिल आकाशगंगा

या दीर्घिका त्यांतील गोल वळलेल्या अशा पंखाच्या पात्यासारख्या, दोन किंवा जास्त सर्पिल भुजांवरून [spiral arms] ओळखता येतात. आपली दीर्घिका याच प्रकारची आहे. सर्पिल आकाशगंगेच्या मध्यभागाजवळ एक फुगवटा असतो, त्याभोवती चपटी अशी तबकडी असते.

या चपट्या तक्कडीच गोल वळलेल्या भुज्या असतात. या प्रकारच्या अनेक दीर्घिका तपासल्यावर लक्षात येते की, मध्याजवळचा फुगवटा लहान – मोठा असू शकतो, तसेच वक्रभुजा एकमेकींजवळ घट्ट किंवा विरळ अशा बनलेल्या असतात. देवयानी ही आपल्या आकाशगंगेच्या सर्वांत जवळची दीर्घिका आहे, ती पाहिल्या प्रकारची आहे. आपली दीर्घिका देखील त्याच प्रकारची आहे. काही दीर्घिकाच्या भुजा विरळ, तसेच तुटकदेखील असतात.

spiral galaxy

सर्पिल आकाशगंगेच्या तबकडीची विशेषता अशी की, ती पसरलेली पण तुलनेने पातळ असते त्यामुळे ती कशी दिसते, हे आपण कुठल्या दिशेतून तिच्याकडे पाहतो यावर अवलंबून असते.जेव्हा चक्राकार आकाशगंगेकडे आपण सरळ तिच्या तबकडी समोरून पाहतो, तेव्हा ती चांगली वर्तुळाकार दिसते. अध्र्या अधिक चक्राकार आकाशगंगाच्या वर एक पट्टा दिसतो. त्याला दंड (Bar) असे म्हणतात हा दंड दीर्घिकाच्या मध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती फिरतो आणि वायू व तारे त्यातून बाहेरच्या बाजूमधून दीर्घिकाच्या मध्येकडे जातात. हे दंड लक्षावधी वर्षांमध्ये तयार होतात व विलियही पावतात.

मधला फुगवटा व बाजूची तबकडी याशिवाय चक्राकार दीर्घिकाच्या सभोवती मोठे पण फिकट असे तेजोवलय असते. त्याआकाशगंगेतील ताऱ्यांचा व त्यांच्या हालचालींचा बारकाईन अभ्यास करताना, हे तेजोवलय लक्षात येते. आपल्या आकाशगंगेतील गोलाकार तारकापुंज जास्त करून अशा तेजोवलयात आहेत.

मधला फुगवटा व तेजोवलय यांत बहुधा जुने तारे असतात. कारण त्यांच्याजवळ भरपूर वायू नसतात. पण तबकडी आणि विशेषतः वळलेल्या भुजा या ठिकाणी भरपूर वायू, धूळ व नवे तारे असतात. कारण जिथे भरपूर वायू व धूळ असतात, तिथे सदा नवे तारे बनत असतात.

भिंगाकार आकाशगंगा

या आकाशगंगानाही सार्पिल आकाशगंगोप्रमाणे मधे फुगवटा व तबकडी साधारण सारखेच तेजस्वी दिसतात. फुगवटा सर्पिल आकाशगंगेच्या फुगवटयाप्रमाणेच असतो, पण यांत वायू व धूळ अधिक प्रमाणात असतात. तबकडीवरदेखील कधी कधी सर्पिल दीर्घिकांच्या प्रमाणे दंड असतो जर बाजूने निरीक्षण केले तर कधी कधी तबकडी पातळ असल्यामुळे नीट दिसून येत नाही.

अनियमित आकाशगंगा

भिंगाकार आकाशगंगा

सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार आकाशगंगांप्रमाणे निश्चित आकार नसणाऱ्या दीर्घिकांना अनियमित दीर्घिका असे म्हणतात. आकारहीन दीर्घिकांचा आकार असामान्य असतो. ते हबल अनुक्रमाच्या कोणत्याही नियमित गटात बसत नाहीत. आणि त्याच्यामध्ये तेजोगोल ही नसतो व सार्पिलाकार फाटेही नसतात.

अनियमित आकाशगंगा irregular galaxy

एकूण दीर्घिकांपैकी यांची संख्या एकत्रितपणे एक चतुर्थांश आहे असे मानले जाते. काही आकारहीन दीर्घिका एकेकाळी सर्पिलाकार किंवा लंबवर्तुळाकार होत्या, पण गुरूत्वीय बलातील विषमतेमुळे त्यांचा आकार अनियमित झाला. आकारहीन दीर्घिकांमध्ये विपुल प्रमाणात वायू व धूळ असू शकते. हे बटू आकारहीन दीर्घिकांसाठी अपरिहार्यपणे खेर नाही.

अनियमित आकाशगंगांचे प्रकार

अनियमित दीर्घिकांचे तीन मुख्य प्रकार आहेत.

  • Irr-I दीर्घिका -या प्रकारच्या दीर्घिकाचा आकार थोड्या प्रमाणात रचनाबद्ध असतो, पण हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करण्याएवढा स्पष्ट नसतो.
  • काही प्रमाणात रचना असणाऱ्या उपप्रकाराला Sm दीर्घिका म्हणतात.
  • सर्पिलाकार रचना नसणाऱ्या उपप्रकाराला Im दीर्घिका म्हणतात.
  • Irr- 2या प्रकारच्या दीर्घिका मध्ये कोणत्याही प्रकारची रचना नसते ज्याच्या आधारे त्यांचे हबल अनुक्रमामध्ये वर्गीकरण करता येईल.
  • Irr 3-ही बटू अनियमित दीर्घिका आहे. या प्रकारच्या दिर्घिका एकूणच दीर्घिकांच्या उत्क्रांतीचे आकलन होण्यासाठी महत्वाच्या मानल्या जातत कारण शक्यतो त्यांची मेटॅलिसिटी कमी असते, त्यांचमध्ये वायू वधूळीचे प्रमाण तुलनेने जास्त असते आणि या दिर्घिका विश्वातील सर्वात पहिल्या दिर्घिकांसारख्या आहेत असे मानले जाते.

आकाशगंगा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

दीर्घिका हा शब्द याला समानार्थी आहे.

मंदाकिनी आकाशगंगेचा आकार कोणता आहे?

आपल्या आकाशगंगेचा आकार हा सर्पिलाकार आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

samsung xr headset आयफोन बद्दल नवीन बातमी