संत शिरोमणी रोहिदास महाराज माहिती मराठी | Sant Rohidas Maharaj Information in Marathi

google-news-icon
नाव संत रोहिदास
वडिलांचे नाव रघु
आईचे नाव कालसी
जन्म ई स १३७७
जन्मस्थळ वाराणसी
पत्नी लोना
मृत्यू १५२७

संत रोहिदास महाराजांचा जन्म पवित्र गंगेच्या किनारी वसलेल्या कशी (आताची वाराणसी ) या गावी झाला. संत रोहिदास महाराजांचे वडील रघु हे चांभार होते. चमड्यापासून चप्पल बनवण्याचं त्यांचं काम होतं. त्यांची आई पण देवाची मोठी भक्त होती. चांगल्या चाललेल्या व्यवसायामुळे त्यांच्या घरात धनाची आणि सुख समृद्धीची कसलीही कमी नव्हती.

संत रोहिदास महाराजांचा पूर्वजन्म

आख्यायिकेनुसार त्यांच्या पूर्वजन्माची गोष्ट पण आहे. त्यांच्या पूर्वजन्मामुळेच त्यांना चांभाराचा व्यवसाय करणाऱ्याच्या घरात जन्म घ्यावा लागला.

मागच्या जन्मी संत रोहिदास महाराज एक ब्रम्हचारी होते. आणि एका ऋषिच्या मठात राहायचे. मग ते रोज भिक्षा मागण्यासाठी जायचे. ‘हरनारायण’ म्हणत ते रोज भिक्षा मगायचे अन जी काही भिक्षा मिळायची त्याचंच माठात अन्न शिजवलं जायचं.

त्याच मठाजवळ एक व्यापाऱ्याचं दुकान होतं. ते खूप नीच वृत्तीचे होते. त्यांचा व्यवसाय काही चांगला नव्हता. ज्या प्रकारे जमेल तसं ते गरिबांना लुबडण्याचा प्रयत्न करायचे. याचं त्यांना कधीच काही वाटेना.
ते लोकांना फसवूण कमी माल द्यायचे आणि जास्तीचे पैसे द्यायचे. ‘ राम की कसम, परमात्मा की सौगंध’ अशा प्रकारे देवाचं नाव घेऊन ते गोरगरिबांना लुयाबडायचे. या पापानं त्यांच्या घरातल्या तिजोरी भरायच्या. अन हे पाप फेडण्यासाठी ते पुण्यकर्म करायचे. याचा त्यांना लाभ होणारच नाही. त्यांच्या पत्नी पतिव्रता राहिल्या नव्हत्या. अशा लोकांच्या घरचं जर अन्न खाल्ल तर संतांची मनं पण दूषित होतील. मन अशांत होईल. प्रभूंच्या नावाचा विसर पडेल.

एका दिवशी खूप पाऊस पडत होता. पूर्व जन्मातले संत रोहिदास महाराज नित्यनियमाने भिक्षा मागत जात होते. मंदिरातून निघताच त्या व्यापाराच्या घरासमोर पाय घसरून ते पडले. त्या व्यापाराचा मुलगा तिथे उभा होता त्याने त्यांना उचलंल आणि स्वतःच्या घरातून पाहिजे तेवढी भिक्षा आणून त्यांना दिली. मग आता पाहिजे तेवढी भिक्षा मिळाल्याने ब्रम्हचारी मठाकडे निघाला. त्या भिक्षेच मठात जेवण बनवलं गेलं.

त्यांच्या गुरूंनी जेवण करण्यास सुरुवात केली. अन्नाचा घास तोंडात जाताच क्षणी त्यांचं मन प्रभूच्या चरणावरून भरकटलं आणि इतर गोष्टींवर जाऊ लागलं. मग यामुळे त्यांनी ब्रम्हचारीला बोलावून घेतलं आणि विचारलं की ही भिक्षा कोणाकोणाकडून आणलास ते सांग. ब्रम्हचारीने घडलेला सर्व प्रकार त्यांच्या गुरूला सांगितला.

सर्व प्रकार ऐकल्यावर त्यांच्या गुरूचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याला श्राप दिला. श्राप असा होता की ते म्हणाले चांभारपेक्षा पण वाईट पुरुषांच्या कमाईची भिक्षा आणून तू आम्हाला ते खाऊ घातलास. हे खूप मोठं पाप तू केला आहेस. याचं प्रायश्चित म्हणून पुढील जन्मी तुझा जन्म एका चांभाराच्याच घरी होईल. आणि त्यांच्या घरी रामनामाचा जप केल्यानेच तुझी मुक्ती होईल. याच श्रापामुळे संत रोहिदास महाराज यांचा जन्म रघु चांभाराच्या घरी झाला.

राम भक्ती आणि संसार

संत रोहिदास महाराज बाल वयातून किशोर वयात आले. ते आता घरातील कामात मदत करू लागले. पण ते जरा विचलित राहायचे. त्यांच्या अशा वागण्याने घरचे पण चिंतित व्हायचे पण त्यांना काहीच म्हणायचे नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून घरच्यांना त्यांना काही बोलायची पण इच्छा व्हायची नाही. अशातच ते जवळच्या एका मठात ते जाऊ लागले. त्यांच्या अशा वागण्याने घरचे चिंतित होऊ लागले हे घर तर सोडून पळून जातील वगैरे. म्हणून घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं.

लग्नानंतर पण त्यांच्या स्वभावात कसलाच बदल झाला नाही. ते त्यांचा आधीच दिनक्रम पाळायचे. त्यांची पत्नी साधी भोळी आणि चांगल्या घरातली होती. त्यांचा आदर करायची. त्यांनी सांगितलेली कामं करायची. अशाच प्रकारे दिवस जात गेले. संत रोहिदास महाराज सकाळी उठायचे स्नान करायचे पूजा करायचे आणि बाकीचा दिवस रामनाम जपण्यात घालायचे. अशाने घरातली काम पण जशास तशी पडून राहू लागली. पण बघणारे आणि ऐकणारे भक्त आहे त्यांना काहीच म्हणायचे नाही. सत्यवचन आणि दानधर्म त्यांचा स्वभाव बनला होता. जर कोणी त्यांनी म्हणालं की माझाकडे चप्पल खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत तर ते त्याला चपलाची जोडी तशीच भेट म्हणून द्यायचे.

पण हा स्वभाव त्यांच्या वडिलांना खटकू लागला. त्यांच्या वडिलांना वाटायचं की संत रोहिदास महाराज निष्काळजी आहेत. मग एका दिवशी संतप्त होऊन त्यांनी रोहिदास महाराजांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की स्वतः च घर वेगळं कर, स्वतःची चूल वेगळी मांड आणि आपापलं वेगळं काम करायला लाग. स्वतःची सगळी कमाई उडवलीस तरी चालेल किंवा जपलीस तरी चालेल पण आम्हाला आता त्रास देऊ नको. सगळं काही तू दान करत आहेस मी हे पाहू शकत नाही. स्वतः च्या पत्नीसोबत वेगळं घर तयार कर.

एवढं सगळं ऐकल्यानंतर संत रोहिदास महारजांना तसूभर पण राग आला नाही. शिवाय ते वडिलांना म्हणाले की तुमची जर हीच इच्छा असेल तर ती मी पूर्ण करेन. सगळी रामाचीच मर्जी आहे त्यांच्या इच्छेनुसार पुढे जे होईल ते होईल. आम्ही आजपासूनच वेगळं राहू.

असं बोलून संत रोहिदास महाराज लाकडं घेऊन आले जवळच रस्त्याच्या बाजूला त्यांनी एक झोपडी तयार केली. यात त्यांच्या पत्नीने पण त्यांना मदत केली. मातीने सारवून त्यांनी छान अशी झोपडी तयार केली. त्यात संत रोहिदास महाराज यांना बसून काम करण्यासाठी आणि येणाऱ्याजाणाऱ्या लोकांना बसण्यासाठी दोन ओटे तयार केले. अशा प्रकारे त्यांनी आपली झोपडी सजवली.

समाजकार्य

चांभार जातीत जन्मल्यामुळे त्यांना पण सामाजिक विषमतेचे चटके बसलेच होते. म्हणून त्यांनी भारतभर फिरून लोकांना, समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत लोक जागृतीचं काम करण्यास सुरुवात केलं. संत रोहिदास महाराज हे मानवतावादी संत होते. त्यांनी समाजकल्याणचा मार्ग अवलंबला होता.
संत रोहिदास महाराजांनी समाजात विषमता निर्माण करणाऱ्या जातीव्यवस्थेला विरोध केला. यासाठीच त्यांनी पूर्ण भारतभर प्रवास पण केला होता.

साहित्य

संत रोहिदास महाराज हे मोठे कवी पण होते. शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरुग्रंथसाहेब’ या ग्रंथात त्यांच्या ४१ कवितांचा समावेश यात आहे.

मृत्यू

संत रोहिदास महाराज यांचा मृत्यू इसवी सन १५२७ साली झाला.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment