विश्वाची निर्मिती कशी झाली? | VISHV NIRMITI

google-news-icon

विश्व निर्मिती (vishv nirmiti):-

ज्या विश्वात आपण राहतो तेच विश्व तीन मिनिटात कशाप्रकारे तयार झाले असाव? बिग बँगच्यावेळी विश्वाच तापमान किती अफाट असेल हे आज जरी शास्त्रज्ञांनी गणिताने काढलं असलं तरी त्याची कल्पना करणं अशक्य आहे. त्या तापमानात फक्त ऊर्जाच तग धरू शकते. दुसरं काहीच नाही. हे प्रयोगांवरून आज सिद्ध झाले आहे.

म्हणजे या उर्जेतूनच मग आईनस्टाइनच्या E=mc2 या सूत्रानुसार वस्तु तयार झाल्या असतील. पण यात एक गोची आहे. या विश्वात ज्याप्रमाणे मॅटर तयार झालं त्याप्रमाणेच अँटीमॅटर पण तयार झालेच. क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमानुसार मॅटर आणि अँटीमॅटर हे एकमेकांना नष्ट करून गॅमा किरण उत्पन्न करू लागले. असं असतं तर मग सगळं मॅटर नष्ट कसं झालं नाही? याचं कारण ‘मॅटर’ हे ‘अँटीमॅटरपेक्षा’ अगदी किंचितस (१/१००००००००० एवढ्या प्रमाणात) जास्त होतं. त्यामुळेच आज सर्व खगोलीय वस्तु निर्माण झाल्या.

विश्वाची निर्मिती व टप्पे | VISHV NIRMITI

पहिला टप्पा

आजच्या या विश्वाच्या इतिहासाचे आठ टप्पे मानले आहेत. पहिल्या टप्प्याला प्लँकचा काळ असे म्हणतात. या काळाचा कालखंड बिग बँग पासून १०-४३ सेकंदपर्यंतच टिकला. या काळाबाबत फारसं सांगता येत नाही. पण जे काही आहे ते याप्रमाणे :- साधारण १३-१५ अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व एक शून्य आकाराच्या पण अनंत ऊर्जा असलेल्या बिंदुप्रमानेच होतं. यालाच ‘सिंग्युलॅरिटी’ असे म्हणतात.

विश्व निर्मिती
Image Credit: Nasa

त्याअगोदर काहीच अस्तित्वात नव्हतं. अवकाश आणि वेळ सुद्धा नव्हतं! मग तो बिग बँगचा क्षण आला. यावेळी स्टीफन हॉकिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हे विश्व दहा मितीच (dimentions) होतं. या बिग बँगनुसार १०-४३ सेकंदपर्यंत हे विश्व मायक्रो स्कोपमध्येही दिसलं नसतं. याच वेळी विश्व चार मितीच आणि सहा मितीमध्ये विभागलं.

या काळात गुरुत्वाकर्षणाचा बल हा इतर बलांइतकाच (म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, स्ट्रॉंग आणि वीक फोर्सेस) प्रबळ होता. त्यामुळे चारही बळ या काळात एकत्र येऊन त्यांचा सुपरफोर्स बनला होता. यानंतर विश्व एक बुडबुड्याच्या आकारचं झालं. त्याचा आकार प्लँकच्या लांबी इतका म्हणजे १०-३३ सेमी होता.

विश्वाची निर्मिती व टप्पे | VISHV NIRMITI

दूसरा टप्पा

दुसऱ्या टप्प्याचा कालखंड बिग बँगनंतर १०-४३ सेकंदापसून १०-३४ सेकंदापर्यंत चा मानला जातो. याला गट काळ असेही म्हणतात. या काळात विश्व प्रसरण पावू लागलं. या क्षणी गुरुत्वाकर्षणाच बळ इतर बळांपासून विलग झाला. तरीपण गट सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे इतर तीन बळ एकसंधच राहिले. म्हणूनच या काळाला ‘गट काळ’ असे म्हणतात.

ऍलन गूथनं सांगितल्याप्रमाणे या काळात विश्व प्रसरण पावू लागल. यावेळीच आपल्या चार मितीच असणाऱ्या विश्वाचा आकार दर १०-३४ सेकंदाला दुप्पट होऊ लागलं हे असं फक्त १०-३० सेकंदच चाललं. याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही जास्त होता. आणि तापमान १०३३ डिग्री होतं. पण याच काळात सहा मितीच्या विश्वाचा आकार १०-३२ सेमी एवढं बारीक झालं.

तिसरा टप्पा

तिसऱ्या टप्प्याचा कालखंड १०-३० सेकंदापसून ३ मिनीटापर्यंतचा मानला जातो. या काळात विश्वाच इनफ्लेशन थांबलं आणि हबलनं सांगितल्याप्रमाण विश्व प्रसरण पावायला लागलं. स्ट्रॉंग फोर्सही इतर फोर्सेसपासून वेगळा झाला. यानंतर विश्व हे क्वार्कस, ग्लुऑन्स आणि लेप्टॉन्स यांच्या लापशीपासून बनलं होतं. याच काळात क्वार्कस एकत्र येऊन त्याच्यापासून प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स तयार झाले. पण त्यावेळी विश्वाचा आकार आपल्या आकाशगंगेएवढाच मोठा होता. त्यावेळी मॅटर आणि अँटीमॅटर यांनी एकमेकांना नष्ट केलं.

पण त्याच्यातलं मॅटर हे अँटीमॅटरपेक्षा किंचितस जास्त असल्यानं मॅटर टिकून राहिलं. पुढं उरलेल्या त्या मॅटरपासून रेणूमय ढग, आकाशगंगा इत्यादी खगोलीय वस्तु तयार झाल्या. याच काळात तापमानही निर्माण झालं. बिग बँगच्या स्फोटानंतर एकाच सेकंदानी विश्वाच तापमान १०० कोटी डिग्री आणि १०० सेकंदानी १०० डिग्री झालं होतं. केवळ मिनिटाभरातच विश्व दहा कोटी मैलात पसरला.

चौथा टप्पा

चौथ्या टप्प्याचा कालखंड तिसऱ्या मिनिटाला सुरू होतो. आतापर्यंतच्या अफाट तापमानामुळे कोणतेच अणू बनू शकले नव्हते. एखाद्या अणूचा गाभा तयार झाल्याबरोबर तो नष्ट व्हायचा. पण त्या गाभ्यास पोषक तापमान निर्माण होऊन तो बनायला सुरू झाला. यातूनच मग प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे कण तयार झाले असतील आणि न्यूट्रॉन्स व प्रोटॉन्स मिळून हीलियम तयार झाला असेल असं गाम्हवच मत होतं.

हायड्रोजन ज्वलनामुळे ताऱ्यांत होणाऱ्या आण्विक प्रक्रियांतून जड मूलद्रव्ये तयार झाली असावीत असं १९३७ साली कार्ल व्हॉन या शास्त्रज्ञाने सांगितले होतंच. याच काळात आज सापडतं तसं ७५% हायड्रोजन आणि २५% हीलियम असं प्रमाण तयार झालं. पण ज्या गाभ्यात पाच किंवा जास्त कण होते ते जास्त काळ तग धरू शकले नाही.

पाचवा टप्पा

पाचव्या टप्प्याचा कालखंड ३,८०,००० वर्षांपासून सुरू होतो. या काळापर्यंत प्रकाश बाहेर येउच शकत नव्हता. तो तयार होताच क्षणी शोषला जायचा. पण आता तो बाहेर पडू लागला. हेच उत्सर्जन थंड होत होत आजही मायक्रोवेव्ह उत्सर्जन म्हणून अवकाशात उरून राहिलंय. आता रात्री दिसणारं आकाश काळं राहिलंय.

सहावा टप्पा

यानंतरच्या काळाचा कालखंड बिग बँगनंतर १ अब्ज वर्षानी सुरू होतो. त्यावेळी विश्वाच तापमान १८डिग्री पर्यंत कमी झालं होतं. आता सगळ्या आकाशगंगा घन होऊ लागल्या. आता ताऱ्यात सगळी मूलद्रव्य गरम होऊन तयार होऊ लागली. हबल दुर्बिणीमार्फत या ताऱ्यांकडे बघता येतं आणि त्या ताऱ्यांतल्या प्रकाश लहरी आणि ऊर्जा यांच्या विश्लेषणावरून त्यांचा इतिहास त्यांचा दूर जाण्याचा वेग आणि त्यांवरची मूलद्रव्यं याविषयी माहिती मिळवता येते.

सातवा टप्पा

सातव्या काळाचा कालखंड ६५० कोटी वर्षानंतरचा आहे. या काळात कुठल्यातरी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धच्या बळामुळे हे विश्व डी सिटरनं किंवा हबलनं मांडलं तसं प्रसरण पावायला लागलं.

आठवा टप्पा

आणि यानंतरचा काळ म्हणजे आजचा वर्तमानकाळ आता सगळे ग्रह, तारे आणि आकाशगंगा वगैरे निर्माण झाले होते. आणि हे विश्वही प्रसरण पावतच आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment