APPLE VISION PRO IN MARATHI 2023
मित्रांनो ६ जूनला Apple ने त्यांचा WWDC2023 हा कार्यक्रम पार पाडला. हा कार्यक्रम तर दरवर्षी तर होतोच पण यावर्षीचा कार्यक्रम जरा वेगळा होता. कंपनीसाठी पण आणि ग्राहकांसाठी सुद्धा. यावर्षीच्या कार्यक्रमात APPLE ने आयफोन आणि आय पॅड च्या OS मध्ये काही नवीन अपडेट आणले आहेत. तर सोबतच MAC BOOK AIR १५ पण लॉंच केला.
यावेळी MAC BOOK AIR हा लॅपटॉप १५ इंच स्क्रीन मध्ये आणला आहे. APPLE च अस म्हणणं आहे की हा सर्वात पातळ लॅपटॉप आहे. पण यावेळच्या कार्यक्रमात चर्चा झाली ती नव्या यंत्राची. याच नाव आहे APPLE VISION PRO. हा डिव्हाईस एक AR/VR हेडसेट आहे. आणि APPLE ने यात भन्नाट वैशिष्ट्ये पण दिली आहेत. नक्कीच APPLE दरवेळी नव्या यंत्रासह लोकांना चकित करतात अन यावेळी पण सर्वांना चकित केलंय.
मुद्दे
APPLE VISION PRO :डिझाईन
या APPLE VISION PRO ची बॉडी ही त्यांनी धातुपासून बनवली आहे. हा धातू एक हलका अॅल्युमिनियम संमिश्र पासून बनवली आहे. याचा डोळ्यावर लावायचा भाग हा थोडा वक्राकार आहे. जेणेकरून तो डोळ्यांवर बरोबर बसेल अन् वापरकर्त्याला एक चांगला अनुभव मिळेल. डोक्याच्या मागचा बंद हा 3d प्रकारे विणलेला आहे. जो की वापरकर्त्याला एक कंफर्ट देईल. यांनी हेडसेट भोवती प्रकाशाचा अडथळा येऊ नये म्हणून एक कपडा लावला आहे. याच्या स्क्रीनसाठी एक ३d लॅमिनेटेड काच वापरलेला आहे जो लेन्स सारखा काम करतो. याला उर्जेसाठी एक वेगळी बॅटरी दिली आहे ज्यामुळे हेडसेट हा हलका होतो. अन् ती बॅटरी सहजरीत्या तुमच्या खिशातही बसते.
APPLE VISION PRO:कंट्रोल्स
APPLE VISION PRO हा डिव्हाईस आपण तीन प्रकारे कंट्रोल करू शकतो.
१) डोळा २) हाताची बोट ३) आवाज
या तीन गोष्टींचा वापर करून हा डिव्हाईस कंट्रोल करू शकता.
या OS मधील कोणतेही ग्राफिक्स एलिमेन्ट (जसे :-APP, फोटो, विडियो , मेसेज) कडे डोळ्याने पडून त्याला सिलेक्ट करू शकता. अंगठा आणि तर्जनीचा वापर करून त्याला ओपेन करू शकता. आवाजाने वापरायचे असेल तर तुम्ही सर्चबारकडे पाहून त्याला वॉइस कमांडने एखादी गोष्ट ब्राऊजर मध्ये सर्च करू शकता. शिवाय सिरीचा पण वापर करू शकता.
APPLE VISION PRO :डिस्प्ले
याची स्क्रीन तर छोटीशी आहे पण याचा डिस्प्ले हा खूप पटीने मोठा आहे. तुमच्या आजूबाजूचा परिसरच तुमचा डिस्प्ले बनतो. या एवढ्या मोठ्या डिस्प्ले वर फोटो, विडियो , गेम्स अन् चित्रपट सुद्धा पाहू शकता तेही ४k मध्ये. ज्यामुळे तुम्हाला एक दांडगा अनुभव मिळतो. तुम्ही यावर ऑनलाइन मीटिंग्स पण घेऊ शकता. या मध्ये तुम्ही APPSचा आकार तुमच्या सोयीनुसार पाहिजे तेवढा मोठा करू शकता. हा आकार तुमच्या खोलीएवढा मोठा होऊ शकतो. एकाचवेळी तुम्ही कितीही APPS वापरू शकता आणि पूर्ण खोलीत त्याला कुठेही ठेऊ शकता अन् वापरू शकता.
- मत्स्य ६०००: गरज काय समुद्रयान मोहिमेची? | Matsya 6000
- AI म्हणजे काय? | What is AI? in Marathi
- Google Bard म्हणजे काय?| What is Google Bard?
तुम्हाला त्या APP ची सावली पण दिसू लागते. यात तुम्ही बॅकग्राऊंड पण बदलू शकता. तुम्ही डिव्हाईस वापरताना जर खोलीमध्ये एखादी व्यक्ती आली तर तुम्ही त्याला सहज पाहू शकता. तो व्यक्तीही तुमचे डोळे सहजरीत्या पाहू शकतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी सहज संवाद करू शकता. याला APPLE EYE SIGHT FEATURE म्हणत. यामध्ये तुम्ही तुमचा MAC पण वापरू शकता. जर तुम्हाला कोणी मेसेजद्वारे ३d ऑब्जेक्ट पाठवला असेल तर तुम्ही तो APPLE VISION PRO मध्ये ३d मध्ये पाहू शकता. तो ऑब्जेक्ट तुम्ही झूम करून किंवा त्याला रोटेट करून पाहू शकता.
फेस टाइम
या फीचरमुळे तुम्ही लोकांना व्हर्च्युअली पण दिसू शकता. तुमचं चेहरा पण पुढच्या व्यक्तीला दिसू लागतो. सोबतच तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, हातच्या हालचाली आणि डोळ्याच्या हालचाली हे पण तुम्ही पाहू शकता. शिवाय चालू विडियो कॉलमध्ये तुम्ही अप्प्स पण वापरू शकता. आणि कॉल वर असणारा पण ते APP पाहू शकतील. समोरच्या व्यक्तीकडे आयफोन, आय पॅड आणि मॅक बूक असेल तरी हे फीचर वापरता येऊ शकते. शिवाय याच्याद्वारे तुम्ही फोटोही काढू शकता आणि विडियो पण तयार करू शकता.
तंत्रज्ञान
APPLEच्या संशोधकांनी आधुनिक मशीन लर्निंगचा वापर केलाय . फेस टाइम फीचरसाठी तुम्हाला वास्तविक दाखवण्यासाठी. यामुळे तुम्हाला कॉल किंवा मीटिंगमध्ये पुढचा व्यक्ती तुमच्या हातच्या हालचाली, डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहू शकतो. याच्या डिस्प्ले साठी APPLE ने मायक्रो OLED डिस्प्ले वापरलाय. आयफोन च्या एक पिक्सेल मध्ये ६४ पिक्सेल मावतील अशाप्रकारे तो पॅनल बनवलाय. दोन्ही लेन्स च्या पॅनलमध्ये प्रत्येकी २३ लाख पिक्सेल्स बसवलेत. यामुळे याची रेसोलूशन ४k पेक्षा जास्त होते.
SPATIAL AUDIO SYSTEM
या सिस्टममुळे आवाज सरळ तुमच्या कानापर्यंत पोहोचतो. याच्या AUDIO RAYTRACING च्या सहाय्याने आणि सेन्सॉर च्या मदतीने तुमच्या खोलीत किती वस्तु आहेत आणि त्या कोठे आहेत याचा अंदाज लावतो. या फीचरमुळे तुम्हाला असे वाटू लागते की आवाज तुमच्या आजूबाजूनेच येतोय.
SPATIAL COMPUTER
APPLE VISION PRO ला पॉवर देण्यासाठी APPLE ने ड्युअल चिप चा वापर केलाय. १) M२ २) R१ M२ चिप कमालीची परफॉर्मेंस देते आणि नवी R१ चिप सेंटर डेटा कमालीच्या वेगाने प्रोसेस करते ज्यामुळे व्हर्च्युअली लॅग कमी होतो.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!