AI म्हणजे काय? | What is AI? in Marathi

AI चा फूल फॉर्म artificial intellegence हा आहे. मराठीत सांगायचं झालं तर कृत्रिम बुद्धिमत्ता असा होतो. यात हा एक प्रोग्रामच आहे. जो की आपण विचारलेल्या माहितीवर उत्तरे देणारे, फोटोत बदल करणारे, गाणी तयार करणारे असे खूप कामे हा AI करू शकतो. सध्या आपल्या जीवनावर खूप प्रभाव पाडला आहे.

google-news-icon

जर तुम्हाला महित नसेल नेमके AI म्हणजे काय आहे तर संदर्भ म्हणून सांगायच तर iron man चित्रपटात jarvis नावाचा AI होता. पुढे friday, edith असे पण AI त्या चित्रपटात होते. मूलतः यांचं काम हे आपलं काम सोपं करणं आहे. आणि ते करत ही आहेत. सध्या जास्त प्रसिद्ध असलेले AI हे गूगल बार्ड आणि chat gpt हे चॅटबॉट तुम्ही ओळखत असालच.

AI वापर कोठे होतो?

सध्या तरी याचा वापर फार अशा ठिकाणी होत नाही. पण पुढे भविष्यात याचा खूप वापर होईल. हा खूप जणांचे नोकरी खाईल तर जे याला वापरायला शिकतील त्यांना नोकऱ्या पण मिळतील. सध्याच्या काळात लोकं स्क्रिप्ट लिहिण्यासाठी, ईमेल लिहिण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी, फोटो एडिट करण्यासाठी, नवीन फोटो तयार करण्यासाठी इ. कामांसाठी यांचा वापर होत आहे.

स्वयंचलित गाड्या

तुम्ही टेस्ला या कंपणीचं नाव तर ऐकलं असेलच. ही कंपनी ai चाच वापर करते त्यांच्या गाड्या चालवण्यासाठी. इतर कंपन्या पण यात सहभागी होत आहेत जसे की apple.

वैद्यकीय परीक्षण

वैद्यकीय क्षेत्रात पण यांचा वापर होत आहे. जिथे मानव आला तिथे त्रुट्या आल्याच. त्यामुळे कधी कधी डॉक्टर कडून काही गोष्टी सुटतात. इथे ai कडून या गोष्टी सुटत नाहीत. ते रोगीमधील लक्षण पाहून त्यांचे पॅटर्न पाहून तो आपला अहवाल तयार करतो.

कस्टमर सर्विस

तुम्ही जिओ, अमेझॉन मधील अलेक्सा हे वापरले असतीलच. ते याच वर्गात मोडतात. याने या कंपन्या काही मूलभूत प्रश्नाची उत्तरे किंवा सेवा सरळ अधिकाऱ्याला न विचारता या ai च्या मदतीने ते पुरवतात. यामुळे अधिकाऱ्यांचा ताण पण कमी होतो. आणि कंपन्यांना कमी लोकं कामावर ठेवावे लागतील.

फोटो एडिटिंगसाठी

adobe या कंपनीने त्यांचं generative fill नावाचं ai लॉंच केलेलं आहे. या ai च्या मदतीने फॉटोशॉप वापरणे आणखीनच सोपे झाले आहे. फोटो एडिटर चं काम पण अगदी सोपं झालं आहे.

AI चे प्रकार

Reactive machines

Limited memory

Theory of mind

Self-aware

Artificial Narrow Intelligence (ANI)

Artificial General Intelligence (AGI)

Artificial Super Intelligence (ASI)

AI चा आपल्याला धोका?

ज्याप्रमाणे आपल्या याचा फायदा होत आहे त्याप्रमाणे याचा धोका पण नक्कीच आहे. जर ai ने आपले काम सोपे केले आहे तर खूप जणांच काम बिघडवलय. खूप जणांच्या नोकऱ्या जाणार. तुम्ही म्हणाल नोकऱ्या मिळतील की? पण ज्या प्रमाणात नोकऱ्या जाणार आहेत त्या प्रमाणात नोकऱ्या नाही मिळणार.

शिवाय AI हे शिकत असतात. त्यामुळे हा एक धोका होऊ शकतो. कारण ते आपली माहिती आणि आपण दिलेल्या माहितीवर प्रक्रिया करून शिकत असतात. त्यामुळे जर AI हॅक झाले तर आपली माहिती पण चोरीला जाईल. पुढे जाऊन जर AI आपल्याला कंट्रोल पण करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही जर असुर २ ही वेब सिरीज पहिली असेल तर तसा पण याचा वापर केला जाऊ शकतो. जे की खूप धोकादायक आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment