Google Bard म्हणजे काय?| What is Google Bard?

google-news-icon

Google Bard हे एक एआय आहे. तुम्ही जर चॅट gpt चं नाव ऐकलं असेल तर तो अगदी तसाच एआय आहे. chat gpt त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप प्रसिद्ध झाला होता. अवघ्या काही दिवसात त्याने खूप मोठा वापरकर्ता वर्ग मिळवला. त्यामुळे जर स्पर्धेत गूगल ला जर टिकायचं असतं तर त्यांना पण एखादा असाच एआय लॉंच करणे भाग होते. त्यामुळे मग त्यांनी १० मे ला एका कार्यक्रमात हा एआय लॉंच केला आणि स्वतः ला स्पर्धेत टिकवलं.

Google Bard

Google Bard ची खरंच काय गरज होती?

Open ai नावाच्या कंपनीने chat gpt नावाचा हा चॅट बॉट बाजारात आणला आणि त्याने धुमाकूळचं घातला. लोकं साध्या कामासाठी सुद्धा त्याचा वापर करू लागले. मग तो ईमेल लिहिणे, रजे चा अर्ज लिहिण्यासाठी, एखादी स्क्रिप्ट लिहिण्यासाठी पण त्याचा वापर करू लागले. अशाने त्याला खूप प्रसिद्धी मिळू लागली. शिवाय याने लोकं गूगलचा वापर कमी करू लागले.
कारण आपल्याला जर एखादा प्रश्न पडला तर आपण तो गूगल वर सर्च करतो. उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्यावरील लेख वाचावे लागतील. मग आपल्याला उत्तर मिळेल. पण chat gpt मुळे हा चॅटबॉट आपल्याला सरळ उत्तर देऊ लागला.
यामुळेच गूगलने या chat gpt ला टक्कर देण्यासाठी आपला Google Bard हा चॅटबॉट १० मे रोजी भारतीय बाजारात आणला. त्याआधी तो फक्त अमेरिकेत वापरण्यासाठी उपलब्ध होता.

Google Bard कसं काम करतं?

जेव्हा हा चॅटबॉट लॉंच केला होता त्यावेळी तो LaMDA या भाषेवर बनवला होता. ही भाषा गूगलच्या गूगल एआय या शाखेने तयार केली होती. Language Model for Dialogue Applications असा या LaMDA चा अर्थ आहे. सध्या हा एआय अजून परफेक्ट नाही तो शिकत आहे त्यामुळे याला वेळोवळी अपडेट केलं जात आहे. मार्च २०२३ च्या अपडेट मध्ये त्याला PaLM या भाषेवर आणलं.

Google Bard काय काम करतं?

तुम्ही जे काही काम chat gpt वर करू शकता ते सर्व काम तुम्ही Google Bard वर पण करू शकता. शिवाय हे chat gpt च्या एक पाऊल पुढे आहे हा चालू घडामोडीवर पण तुम्हाला माहिती देऊ शकतं. chat gpt चं जे फ्री व्हर्जन आहे त्यात हे फीचर नाही. तुम्ही Bard ला एखादा कोड पण लिहायला सांगू शकता. किंवा एखादा कोड दिला तर त्यात एखादी चूक असेल तर तेही तो सांगतो. कविता, लेख, कोड, यूट्यूब ची स्क्रिप्ट पण तो लिहू शकतो.

Google Bard किती भाषांमध्ये वापरता येऊ शकतो?

सुरुवातीला जेव्हा तो लॉंच केला होता तेव्हा तो फक्त इंग्रजीमध्येच वापरता येत होता. पण सध्या १४ जुलै ला त्याला अपडेट केलं गेलं या अपडेट मध्ये तो ४० वेगवेगळ्या भाषांमध्ये वापरता येऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं. यात मराठीचा पण समावेश होता. पण अजून तरी तो आपल्या मराठीत तेवढा पारंगत झाला नाहीये. यासाठी त्याला वेळ लागेल.

Chat gpt vs Google Bard

chat gpt च्या प्रसिद्धीमुळे मायक्रोसॉफ्ट ने त्याला फंडिंग दिली आणि एक करार केला त्या करारा अंतर्गत मायक्रोसॉफ्ट ने chat gpt ला त्यांच्या सर्च इंजिन मध्ये जोडलं. यामुळे त्यांच सर्च इंजिन बिंग हे जास्त लोकं वापरू लागले. कारण ज्यासाठी त्यांना पैसे मोजवे लागणार होते ते मोफत मिळू लागलं. अपडेटेड chat gpt ज्याला इंटरनेट वापरता येत होतं त्यासाठी पैसे मोजावे लागत होते पण बिंग मुळे ते मोफत झालं.

google bard user interface

या स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट उतरलं असल्याने गूगलला पण स्पर्धेत उतरण भाग होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच चॅटबॉट लॉंच केला. गूगल चं असं म्हणणं आहे की हा एआय chat gpt पेक्षा खूप चांगला आहे. आणि अधिक चांगल्या पद्धतीने हा उत्तरे देऊ शकतो. नव्या पद्धतीने यात तुम्हाला उत्तरे मिळतील जे की chat gpt मध्ये शक्य नाहीत. हे एआय PaLM या तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यात खूप जास्त माहिती आहे आणि ते उद्ययावत आहे. सांगायचं झालं तर LaMDA पेक्षा १० पटीने मोठ्या माहितीवर काम करतं.

जुलै मधील अपडेट

गूगल ने जुलै मध्ये google bard मध्ये काही नवीन बदल केले आहेत. यात तुम्ही त्याला प्रश्नासोबत फोटो इनपुट करून त्याबाबतीत पण प्रश्न विचारू शकता. chat gpt प्रमाणे यात चॅट्स सेव्ह करू शकता. त्याने दिलेलं उत्तर तुम्ही ऐकू शकता.

google bard extensions

सप्टेंबर मधील अपडेट

सप्टेंबरमध्ये गूगलने काही नवीन बदल केले आहेत. यात त्यांनी नवीन एक्सटेन्शन जोडले आहेत. जे तुमच्या खात्याशी निगडीत डॉक्स, ड्राइव, जीमेल आणि यूट्यूब यांच्याशी जोडलेले आहेत. शिवाय गूगल फ्लाइट, गूगल हॉटेल आणि गूगल मॅपशी पण जोडले आहे. जेणेकरून तुम्हाला अजून चांगले उत्तर मिळेल. सोबतच तुम्ही यूट्यूब वरील विडियो न पाहता त्याच्या काय आहे हे गूगल बार्डला पण विचारू शकता. तो तुमच्यासाठी तो विडियो पाहतो आणि उत्तरे देतो.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment