तारीख ठरली
चंद्रयान-३ च्या लॉंचसाठी १४ जुलै २०२३ ही तारीख ठरली. वेळ २ वाजून ३५ मिनिटे दुपारचे . सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा
चाचण्या
चंद्रयान ३ च्या सर्व चाचण्या केल्या गेल्या. प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांना निमंत्रण देण्यात आले.
सराव
लॉंचच्या आधी एक रंगीत तालीम केली जाते. तीच या दिवशी करण्यात आली. जेणेकरून ऐनवेळी कोणतीही अडचण होऊ नये.
प्रक्षेपण यशस्वी
दुपारी २ वाजून ३५ मिनिटाला चंद्रयान ३ चं प्रक्षेपण यशस्वीरित्या करण्यात आलं. चंद्रयान ३ ला त्याच्या कक्षेत अचूकपणे सोडण्यात आलं.
पहिली कक्षा वाढविली
जवळ नेण्यासाठी त्याची ककक्षा वाढविली जाते. पहिली कक्षा याच दिवशी वाढवण्यात आली.
४१७६२ km x १७३ km च्या कक्षेत तो आला.
दुसरी कक्षा
४१६०३ km x २२६ km या कक्षेत आला.
चौथी कक्षा
७१३५१ km x २३३ km या कक्षेत आला.
चंद्राच्या दिशेने
आता चंद्रयान ३ चंद्राच्या दिशेने निघाला आहे. पृथ्वीच्या गुरत्वीय बलातून तो मुक्त झाला.
चंद्र गाठला
यशवीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहोचला.
२८८ km x ३६९३२८ km या कक्षेत तो होता.
चंद्राच्या जवळ
चंद्रयान ३ ची कक्षा कमी करण्यास सुरुवात केली.
१६४ km x १८०७४ km या कक्षेत त्याला आणलं.
चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत
१७० km x ४३१३ km या कक्षेत त्याला आणलं. याच कक्षेत असताना चंद्रयान ३ ने चंद्राचा पहिला विडियो पाठवला.
अजून जवळ
१७४ km x १४३७ km या कक्षेत आणलं.
जवळ
१५१ km x १७९ km या कक्षेत आणलं.
जवळ
१५३ km x १६३ km या कक्षेत आणलं.
विलगीकरण
लँडर मॉड्यूल आणि प्रॉपल्शन मॉड्यूल दोघाला वेगळं करण्यात आलं.
वेग कमी
चंद्रयान ३ चा वेग कमी करून त्याला चंद्राच्या आणखी जवळ आणण्यात आलं. याला डिबूस्टिंग असं म्हणतात.
उतरणार
23 ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येईल. संध्याकाळी ६ वाजून ४ वाजता याला उतरवण्यात येईल.
चंद्रयान ३ सुरक्षित उतरेल का?
यावर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी एका मुलाखतीत एक वक्तव्य केलं आहे- ” जरी चंद्रयान ३ चे दोन इंजिन निकामी झाले तरी चंद्रयान चंद्रावर सुरक्षितपणे उतरू शकते. यावेळी आम्ही याची रचनाच अशा प्रकारे केली आहे. याच्यासाठी आम्ही वेगळे अल्गॉरिथम तयार केले आहेत की ते स्वतः लँड होईल.” पुढं ते म्हणाले की “यात फक्त एकाच अडचण आहे ती म्हणजे विक्रम लँडर यावेळी आडवा आहे त्याला चंद्रावर लँड करण्यासाठी सरळ म्हणजे उभं करावं लागेल जे की खूप अवघड काम आहे. गेल्यावेळी पण आम्हाला याच ठिकाणी अडचण आली होती.”
चंद्रयान २ च्या वेळी अगदी शेवटच्या क्षणी काही अंतरावर असताना चंद्रयान २ शी आपला संपर्क तुटला होता. त्यामुळे यावेळी चुका सुधारण्यासाठी इस्रोने वेळ घेतला. हवे ते बदल केले आणि मगच पार चांद्रमोहिम आखली. नाही तर आपल्याला पुढील काही महिन्यातच चंद्रावर जाता आलं असतं.
चंद्रयान ३ चंद्रावर कधी उतरणार आहे?
२३ ऑगस्ट ला संध्याकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी चंद्रयान ३ चंद्रावर लँड करणार आहे.
चंद्रयान ३ चंद्राच्या कोणत्या भागावर उतरणार आहे?
चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवात काय आहे?
भारताने पहिल्या चांद्रयानाच्या मदतीने चंद्रावर पाणी बर्फ रूपात असल्याचा दावा केला होता. यामुळे या बर्फाचा वापर इंधन, ऑक्सिजन आणि पिण्याचे पाणी म्हणून करता येऊ शकतो. यासाठी सर्व देश चंद्रावर मोहीम आखत आहेत.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!