भारताचं चंद्रयान ३ हे चंद्रावर स्वारी करण्यासाठी सज्ज आहे. आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा इथून ये यान १४ जुलै रोजी दुपारी २:३५ वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे. चंद्रयान २ जे की अंशतः अयशस्वी राहिलं होतं त्यामुळे त्या मोहिमेला पूर्ण करण्यासाठी हे यान पाठविले जात आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले जाणार आहे तर चला जाणून घेऊया हा दक्षिण ध्रुव एवढा का महत्वाचा आहे.
मुद्दे
इस्रो च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे चंद्रयान ३ हे त्याच्या प्रक्षेपणानंतर जवळपास एका महिन्याच्या अंत चंद्राच्या कक्षेत पोहचेल. त्यानंतर विक्रम रोवर आणि प्रज्ञान लँडर हे २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरविले जाईल. ज्याठिकाणी चंद्रयान २ उतरणार होतं त्याच्याच जवळपास हे चंद्रयान ३ उतरविले जाणार आहे. दक्षिण ध्रुवाच्या ७० अंशा अक्षवृत्तावर हे उतरवले जाणार आहे. जर सर्व काही योग्य झाले तर चंद्रयान ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणारे हे पहिले यान ठरेल.
याआधी जेवढेपण चंद्रावर स्वाऱ्या झाल्या आहेत ते सर्व यान चंद्राच्या विषुववृत्तावर उतरवले आहेत. किंवा त्याच्या जवळच उतरले आहेत. नासाने पाठवलेले पहिले यान जे की १० जानेवारी १९६८ साली पाठवले होते ते देखील याच भागात उतरले होते. ते यान दक्षिणच्या ४० अंश अक्षवृत्तावर उतरवले होते.
दक्षिण ध्रुवावर अजून एकही यान का उतरले नाही?
या मागे खूप रंजक असं कारण आहे की आत्तापर्यंत का एकही यान चंद्रावर उतरले नाही. जे पण यान चंद्रावर गेले आहेत ते विषुववृत्तावरच उतरले आहेत. चीनचं जे चॅंग यान चंद्रावर गेलं होत ( हे यान चंद्रयान २ नंतर चंद्रावर पाठवलं होतं ) जे दक्षिण ध्रुवाच्या जवळ होतं ते सुद्धा फक्त ४५ अंश अक्षवृत्तावर उतरलं होतं. ज्या भागावर चंद्रयान उतरणार आहे ते पृथ्वीवरून दिसत नाही.
चंद्राच्या विषुववृत्तावर उतरणे खूप सोपे आहे. या भागातील तापमान आणि भौगोलिक स्थान हे यानावरील यंत्रांसाठी खूप पोषक आहे. या वातावरणामुळे ही उपकरणे तिथे जास्त काळ टिकू शकतात. इथला पृष्ठभाग पण फारसा खडकाळ नाही. एकसमान असा हा पृष्ठभाग आहे. शिवाय इथे फारसे खड्डे किंवा डोंगर पण नाहीत. पुरेसा सूर्यप्रकाश मिळत असल्याने उपकरणेही जास्त काळ टिकतात.
विषुववृत्त हे मोहीम आखण्यासाठी खूप सोपे आहे पण त्याचे ध्रुवीय भाग हे खूप वेगळे आहेत आणि खूप अवघड पण आहेत. यांच्यातील खूप असे भाग आहेत जिथे सूर्यप्रकाशच पोहोचला नाही. त्यामुळे इथलं तापमान हे उणे २३० अंश पोहोचले आहे. कमी तापमान आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे उपकरणांना काम करण्यास खूप अडचणी येतात. त्यांची चार्जिंग संपल्यावर सूर्यप्रकाश नसणार आहे आणि थंडीमुळे उपकरणे खराब होऊ शकतात. आपण जे लँडर चंद्रावर पाठवणार आहोत त्याची काम करण्याची मुदत ही १४ दिवसांचीच असणार आहे. चंद्रावरील खड्डे पण खूप मोठे आहेत काही सेंटिमिटर पासून ते हजारो किलोमीटर पर्यंत ते पसरले आहेत.
दक्षिण ध्रुवच का?
या अशा विरुद्ध पर्यावरणामुळे चंद्राचा हा भाग आपल्यापासून वंचित राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या मोहिमांमध्ये हा भाग संशोधनासाठी रोचक असून शकतो असे स्पष्ट झाले आहे. चंद्राच्या या भागात बर्फाच्या रूपात पाण्याचे संयुग उपलब्ध आहेत. भारताने २००८ साली पाठवलेल्या चंद्रयान १ या मोहिमेत चंद्रावर पानी असल्याचं भारताने पहिल्यांदा जगाला सांगितलं होतं. त्या यानावरील दोन उपकरणामुळे याचा शोध लागला होता.
अतिशय थंड वातावरणामुळे जर एखादं यान इथे अडकलं तर ते थंडीमुळे खराब होऊन जाईल. चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील दगड आणि माती आपल्याला सूर्यमालेच्या निर्मितीविषयी माहिती देऊ शकतात.
चंद्राच्या या भागावर प्रकाश का पडत नाही?
तुम्हाला हे तर माहितीच असेल की आपल्या पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कलला आहे. पण चंद्राच्या बाबतीत तसे नाही त्याचा अक्ष हा १.५ अंशाने कलला आहे. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे त्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर आणि तेथील खड्ड्यांवर सूर्यप्रकाश पोहोचलाच नाही. हे सदाच सावलीत राहिलेले भाग आहेत.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!
प्रश्नोत्तरे
चंद्रयान ३ चे प्रक्षेपण कधी केले जाणार आहे?
१४ जुलै रोजी दुपारी २:३५ वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे.