इस्रोची चंद्रयान ३ मोहीम फत्ते! | Full Information About Chandrayaan 3 in Marathi

google-news-icon

चंद्रयान मोहीम भारतासाठी यशस्वी ठरली आहे. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान यशस्वीपणे चंद्राच्या धरतीवर उतरलंय. ही कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरलाय.

याआधी चंद्रावर तीन देशांचे यान उतरले आहेत. अमेरिका, चीन आणि रशिया हे देश चंद्रावर उतरले आहेत. या विक्रमासोबतच भारताने अजून एक विक्रम आपल्या नावावर केलंय.

आधी जे पण देश चंद्रावर उतरलेत ते चंद्राच्या विषुववृत्तावर किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात उतरले आहेत. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. खरं तर रशियाकडे हा विक्रम त्याच्या नावे करण्याची संधि होती. पण त्यांचं लुना यान चंद्रावर कोसळला. त्यामुळे भारतावर मोठी जबाबदारी होतीच. ती भारताने पूर्णपणे यशस्वी पार पाडली.

पार्श्वभूमी

याआधीही भारताने चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटच्या क्षणी त्याच्याशी संपर्क तुटला. त्यामुळे आपण चंद्रावर पहिल्या प्रयत्नात उतरण्यात अयशस्वी ठरलो. पण तरी शास्त्रज्ञांनी पुढील १४ दिवस त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. पण यात काही यश आले नाही.

यामुळे या मोहिमेला खूप जणांनी अयशस्वी हा शिक्का मोर्तब केला होता. पण तसं नव्हतं. कारण यात आपण ऑर्बीटर पण पाठवला होता. याचं काम चंद्राभोवती कक्षेत फिरून माहिती पाठवण्याचं काम होतं. जे त्यानं चोख बाजवलं. याचं आयुष्य एक वर्ष मानलं होतं पण तो अजून कार्यरत आहे. यावेळी त्याची मदत पण झाली.

खरं तर चंद्रयान २ नंतर भारत पुन्हा चंद्रावर अवघ्या सहा महीने किंवा एका वर्षात परत जाऊ शकलं असतं. पण भारताने मागील मोहिमेतील त्रुटींचा आढावा घेत त्यांच्यावर काम इस्रोच्या शास्त्रज्ञांनी काम केलं. त्या त्रुटी कमी केल्या अन् यावेळी पूर्ण तयारीनिशी ही मोहीम आखली होती.

यावेळी इस्रोचे सध्याचे प्रमुख एस सोमनाथ यांचा चंद्रयान ३ वर खूप विश्वास होता. त्यांनी हेही सांगितलं होतं की जरी याचे दोन इंजिन फेल झाले तरी चंद्रयान चंद्रावर सुरक्षितपणे उतरेल असाच विश्वास इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांनीही असाच विश्वास चंद्रयान ३ वर दर्शवला होता. आणि चंद्रयान यांच्या विश्वासावर खरं उतरलं.

चला जाणून घेऊयात चंद्रयान ३ चंद्रावर कसं उतरलं

यामध्ये एकूण चार चरण होते. ज्यामध्ये यानाला ३० किलोमीटर अंतरावरून त्याला चंद्राच्या भूमीवर उतरवणे हे कामे होती.

पहिल्या चरणात चंद्रयानाची ऊंची ३० किलोमीटरवरून ७ किलोमीटरवर आणायचं होतं. यासाठी एकूण साडे अकरा मिनिटांचा कालावधी लागणार होता. यात त्याची व्हेलॉसिटी ही १६८० m/s वरून ३५८ m/s पर्यंत आणायचं होतं.

दुसऱ्या चरणात याची ऊंची ६.८ किलोमीटरवर वर आणण्यात आलं. यासाठी १० सेकंदचा कालावधी लागला. यावेळी याच्यातील कारा आणि लासा हे सेन्सॉर चालू होतील आणि त्याच्या वेगाची आणि उंचीचं मोजमाप करतील.

तिसऱ्या चरणात यानाची ऊंची ८०० मीटरवर आणण्यात आली. ही ऊंची ज्या ठिकाणी तो उतरणार होता त्याची आहे. यावेळी चंद्रयान पूर्णपणे सरळ म्हणजे उभा झाला होता. यासाठी याला ३ मिनिटांचा कालावधी लागला.

शेवटच्या चरणात याचे दोन इंजिन बंद करण्यात आले. यावेळी याची व्हेलॉसिटी शून्य करण्यात आली. यावेळी तो १५० मीटर उंचीवर होता. इथे तो २२ सेकंदासाठी तिथेच होता. मग नंतर त्याला यशस्वीरित्या त्याला ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरवण्यात आले.

या पूर्ण प्रक्रियेत हे सर्व काम चंद्रयानाने ही सर्व प्रक्रिया स्वतः केली होती. आपण फक्त इथे बसून त्याच्याकडून येणारी माहिती बघत होतो. कारण शास्त्रज्ञांनी यात आधीच एक प्रोग्राम तयार करून फिट केला होता. त्यामुळे इथून त्याला कोणताही आदेश दिला गेला नव्हता.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

Chadrayaan 3 Moon Landing मंगळाचा दिवस कमी होतोय