पु. ल. देशपांडे माहिती मराठी | P L Deshapande Information in Marathi

google-news-icon

पु. ल. देशपांडे हे मराठीतील श्रेष्ठ विनोदी लेखक, नाटककार व बहुरूपी कलावंत म्हणून महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत. ‘महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ असेच त्यांचे वर्णन करणे उचित ठरेल. त्यांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत यशस्वीरीत्या संचार केला आहे.

अल्प परिचय

पु. ल. देशपांडे यांचे संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे आहे. त्यांचा जन्म मुंबई येथे ८ नोव्हेंबर, १९१९ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे झाले. एम. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यानंतर आकाशवाणी व दूरदर्शनवरील प्रमुख अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

साहित्यिक कार्य व मूल्यमापन

पु. ल. देशपांडे साहित्याच्या क्षेत्रात विनोदी लेखक व नाटककार म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी मराठीत सुरू केलेली विनोदी लेखनाची परंपरा राम गणेश गडकरी आणि आचार्य अत्रे यांच्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी समर्थपणे सांभाळली. सहज, स्वाभाविक विनोद हे त्यांच्या विनोदी लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. मानवी जीवनातील विसंगतींचाही त्यांनी विनोदनिर्मितीसाठी मार्मिकपणे उपयोग केला आहे.

विनोदाच्या प्रांतात त्यांनी स्वतःचे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. नाटककार म्हणूनही मराठी साहित्यात त्यांना श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे. त्यांचे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक वाङ्मयीन मूल्याच्या दृष्टीने अतिशय वरच्या दर्जाचे आहे. आचार्य अत्रे यांनी तर म्हटले आहे की, “तुझे आहे तुजपाशी हे एकच नाटक जरी पु. लं. नी लिहिले असते तरी आम्ही त्यांना नाटककार म्हणून गौरविले असते.” अर्थात, त्यांची अन्य नाटकेही अशीच श्रेष्ठ दर्जाची आहेत.

पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेली प्रवासवर्णनपर पुस्तकेदेखील बरीच लोकप्रिय झाली आहेत. सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि मानवी स्वभावाचे अचूक विश्लेषण या वैशिष्ट्यांमुळे त्यांची प्रवासवर्णने लक्षवेधी बनली आहेत. त्यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रेही अशीच प्रभावी व लक्षवेधी ठरली आहेत. याशिवाय एकांकिका, लोकनाट्य इत्यादी लेखनही त्यांनी केले आहे.

पु. ल. देशपांडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक मिळविला आहे. दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, नट, पटकथा लेखक अशा विविध नात्यांनी त्यांनी चित्रपटसृष्टीची सेवा केली आहे. ‘पुढचं पाऊल’, ‘गुळाचा गणपती’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होत. पु. ल. देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगांनादेखील रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

पु. ल. देशपांडे यांची सामाजिक क्षेत्रातील कामगिरीदेखील गौरवपात्र आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांना उदारहस्ते देणग्या दिल्या आहेत. ते लेखनस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. एक प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांची प्रसिद्धी आहे.

मान-सन्मान

पु. ल. देशपांडे यांना आतापर्यंत अनेक मान-सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९७४ मध्ये इचलकरंजी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण‘ हा किताब देऊन त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा गौरव केला आहे. मध्य प्रदेश शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ‘कालिदास सन्माना’चेही ते मानकरी ठरले आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र भूषण‘ या नागरी सन्मानाचे १९९५-९६ चे म्हणजे पहिलेच मानकरी ठरण्याचा यथार्थ सन्मानही त्यांना लाभला होता.

मृत्यू १२ जून, २०००

पु. ल. देशपांडे यांची पुस्तकांची नावे

  • खोगीरभरती
  • नस्ती उठाठेव
  • बटाट्याची चाळ
  • असा मी असामी
  • गोळाबेरीज
  • हसवणूक इत्यादी

पु. ल. देशपांडे यांची विनोदी लेखसंग्रह

  • व्यक्ती आणि वल्ली
  • गणगोत इत्यादी

व्यक्तिचित्रे- संग्रह

  • तुझे आहे तुजपाशी
  • अंमलदार
  • सुंदर मी होणार
  • तुका म्हणे
  • आता पुढारी पाहिजे
  • ती फुलराणी
  • तीन पैशांचा तमाशा इत्यादी
  • नाटके
  • सदू आणि दादू
  • विठ्ठल तो आला आला इत्यादी

एकांकिकासंग्रह

  • अपूर्वाई
  • पूर्वरंग
google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment