आचार्य प्रल्हाद केशव ( प्र के ) अत्रे माहिती मराठीत | Pra Ke Atre Information in Marathi

google-news-icon

pralhad keshav atre information in marathi, केशवकुमार यांची माहिती, केशवकुमार यांचे पूर्ण नाव,

टोपण नाव केशवकुमार
जन्म १३ ऑगस्ट, १८९८
जन्मगाव कोठीत जि पुणे
वडील केशव विनायक अत्रे
आई अन्नपूर्णाबाई केशव अत्रे
अपत्य शिरीष, मीना
कार्य नाटक लेखन, कवी, पत्रकार, चित्रपट निर्माते
मृत्यू मृत्यू १३ जून, १९६९

आचार्य प्र के अत्रे हे उभ्या महाराष्ट्राचे लाडके व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होय. मराठी भाषेतील श्रेष्ठ विनोदी लेखक, सिद्धहस्त नाटककार, विडंबनकार, झुंजार पत्रकार, कुशल वृत्तपत्र संपादक, यशस्वी चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक अशा अनेक नात्यांनी ते मराठी जनतेला परिचित आहेत. एक प्रभावी व विनोदी वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

आचार्य प्र के अत्रे परिचय

आचार्य प्र के अत्रे यांचे संपूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील कोठीत या गावी १३ ऑगस्ट, १८९८ रोजी झाला. त्यांचे शिक्षण सासवड, पुणे, मुंबई येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. तेथे त्यांनी शिक्षणशास्त्रातील टी. डी. ही लंडन विद्यापीठाची पदवी संपादन केली. अत्र्यांचे शिक्षण बी. ए., बी. टी., टी. डी. (लंडन) इतके झाले होते.

आचार्य प्र के अत्रे यांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षक म्हणून केली. ते हाडाचे शिक्षक होते. शिक्षणक्षेत्रात त्यांनी अनेक नवनवे प्रयोग केले. महाराष्ट्रातील एक नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

आचार्य प्र के अत्रे यांचे साहित्यिक कार्य

साहित्याच्या क्षेत्रात आचार्य प्र के अत्रे यांनी असामान्य कर्तृत्व गाजविले. एक यशस्वी व प्रतिभाशाली नाटककार म्हणून त्यांना विशेष लौकिक प्राप्त झाला होता. आचार्य प्र के अत्रे यांच्या नाट्यक्षेत्रातील कर्तबगारीचे मुख्य वैशिष्ट्य असे की, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केले आणि आपली एकापाठोपाठ एक अशी यशस्वी नाटके रंगभूमीवर आणून त्यांनी मराठी रंगभूमीला पूर्वीचे वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून दिले. अशा प्रकारे नाट्यक्षेत्र गाजवून अत्र्यांनी त्या क्षेत्रातून स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारली; परंतु दीर्घ कालावधीच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा एकदा नाटकाकडे वळले आणि या वेळीही आपल्या पुनरागमनाने त्यांनी रंगभूमी दणाणून सोडली.

साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी, जग काय म्हणेल?, भ्रमाचा भोपाळा, मोरूची मावशी, उद्याचा संसार, तो मी नव्हेच, डॉक्टर लागू ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली काही नाटके होत.

आचार्य अत्रे हे विडंबन कवी म्हणूनही लोकप्रिय झाले. त्यांनी केशवकुमार या नावाने विडंबनात्मक कविता लिहिल्या. ‘झेंडूची फुले‘ हा त्यांचा विडंबनात्मक कवितांचा संग्रह अतिशय गाजला. आचार्यांच्या विडंबनकाव्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यानंतर अनेकांनी केला; पण आचार्यांइतके यश दुसऱ्या कोणत्याही कवीला मिळविता आले नाही.

झुंजार पत्रकार‘ या नात्यानेही आचार्य प्र के अत्रे महाराष्ट्रीय जनतेला चांगलेच परिचित आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात अत्यंत अभिमानास्पद अशी परंपरा निर्माण झाली आहे. या परंपरेतील एक महत्त्वाचे मानकरी असा अत्र्यांचा रास्त गौरव केला जातो. त्यांनी ‘नवयुग‘ (१९४०) हे साप्ताहिक व ‘मराठा‘ (१५ नोव्हेंबर, १९५६) हे दैनिक चालविले होते. त्यांपैकी ‘मराठा’ ने तर मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते. आचार्य अत्र्यांचे ‘मराठा’तील अग्रलेख मराठी वाङ्मयाची अमोल लेणी ठरले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतही आचार्य अत्र्यांनी मोठे कर्तृत्व गाजविले होते. त्यांनी निर्माण केलेले ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली, वसंतसेना, श्यामची आई, महात्मा फुले इत्यादी चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते. ‘महात्मा फुले’ हा त्यांचा आणखी एक चित्रपट राष्ट्रीय पारितोषिकाचा मानकरी ठरला होता.

अष्टपैलू आचार्य प्र के अत्रे

आचार्य प्र के अत्रे यांनी कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रासंगिक स्फुटलेखन अशा अन्य वाङ्मयप्रकारांतही विपुल लेखन केले आहे. अत्र्यांची प्रतिभा अष्टपैलू होती. त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत चौफेर कर्तृत्व गाजविले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील त्यांची कामगिरी तर अतुलनीय अशीच होती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक प्रमुख नेते होते. आपल्या घणाघाती वक्तृत्वाने आणि प्रभावी लेखणीने त्यांनी त्या काळात संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला होता.

आचार्य प्र के अत्रे यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते काही काळ पुणे नगरपालिकेचे सभासद होते. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसच्या प्रचारकार्यात त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेवर सन १९५७ मध्ये व १९६२ मध्ये अशी दोन वेळा त्यांची निवड झाली होती. लोकप्रतिनिधी या नात्याने विधानसभेतही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. याशिवाय अनेक जन आंदोलनात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. १९४२ मध्ये नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

मृत्यू १३ जून, १९६९.

आचार्य प्र के अत्रे यांनी लिहिलेली नाटक, कविता, पुस्तके

  • आचार्य अत्रे यांनी लिहिलेले नाटक
  • साष्टांग नमस्कार
  • पराचा कावळा
  • पाणिग्रहण
  • गुरुदक्षिणा
  • कवडीचुंबक
  • वदे मातरम्
  • जग काय म्हणेल
  • घराबाहेर
  • उद्याचा संसार
  • मोरूची मावशी
  • ब्रह्मचारी
  • भ्रमाचा भोपळा
  • प्रीतिसंगम
  • मी मंत्री झालो
  • मी उभा आहे
  • बुवा तेथे बाया
  • डॉक्टर लागू
  • लग्नाची बेडी
  • तो मी नव्हेच
  • आचार्य अत्रे यांनी लिहिलेले काव्यसंग्रह
  • झेंडूची फुले
  • गीतगंगा
  • आचार्य अत्रे यांनी लिहिलेले कथा
  • कशी आहे गंमत
  • साखरपुडा
  • वामकुक्षी
  • वेड्यांचा बाज़ार
  • बत्तीशी
  • ब्रँडीची बाटली कथासंग्रह
  • कऱ्हेचे पाणी व मी कसा झालो? :आत्मचरित्रपर ग्रंथ
  • आषाढस्य प्रथम दिवसे, केल्याने देशाटन, मराठी माणसे मराठी मने, सिंहगर्जना, हास्यकथा, हंशा आणि टाळ्या, उवाच, विनोद गाथा, सूर्यास्त, मुद्दे आणि गुद्दे, समाधीवरील अश्रु, अत्रे हुंदके, दुर्वा आणि फुले, साहित्य यात्रा इत्यादी अनेक ग्रंथ.
google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

Gmail Security tips marathi | जीमेल सुरक्षित आहे का? facts about earth marathi Hubble Telescope Facts Marathi विक्रम लँडर | Vikram Lander on Moon