राजमाता जिजाबाई माहिती मराठी | Rajmata Jijabai Information in Marathi

google-news-icon
जन्म १२ जानेवारी १५९८
वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव
आईचे नाव म्हाळसाबाई जाधव
जन्मगाव सिंदखेड
पतीचे नाव शहाजीराजे भोसले
अपत्ये संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज
उपाधी राजमाता
राष्ट्रमाता
स्वराज्य जननी

ज्यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रचली, ज्यांनी लहानशा शिवबाला या हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावर बसवून अखंड हिंदुस्तानाला स्वराज्याची देन दिली अशा या राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले. त्यांना राजमाता आणि राष्ट्रमाता या उपाधी पण दिल्या आहेत. यांना स्वराज्याची जननी जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण यांनी पाहिलेलं स्वप्न पुढे शिवरायांनी असं काही उभारलं की शत्रूच्या काळजाचा ठोका पण चुकू लागला. तर चला जाणून घेऊ या माऊलीची माहिती. 

राजमाता जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड मध्ये झाला. यांचं माहेर हे जाधवांचं. लखुजीराजे जाधव त्यांचे वडील होते. जाधवांकडे सिंदखेड मुलूखाची वतनदारी होती. त्यांच्या आईचं नाव म्हाळसाबाई असं आहे. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. 

राजमाता जिजाऊ जन्मस्थळ- फोटो अलौकिक मराठी
राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड

राजमाता जिजाबाईंच्या जन्माचा प्रबळ पुरावा अजून तरी उपलब्ध नाही. पण तत्कालीन घडामोडींच्या आधाराने त्यांचा जन्म १५९५ ते १८०० च्या मध्ये झाला असावा असं सांगतात. 

बालपण

लहान वयात जिथं मुली भातुकलीचे खेळ खेळायचे त्या वयात जिजामाता तलवारी फिरवायच्या. लहानपणापासूनच त्या शूरवीरांच्या दरबारात सरदार होते. त्यामुळे परकीयांच्या इथे केली जाणारी चाकरी आणि स्वतःचा मुलुख असतानाही टी दुसऱ्याची दिलेली वतनदारीच आहे असा तो काळ होता. स्वतःच्या रयतेसाठी निर्णय आपण घेऊ शकत नाही अशा अनेक गोष्टी जिजामातांना खटकत होत्या. 

जिजाऊ वाडा फोटो अलौकिक मराठी
जिजाऊ वाडा सिंदखेड

विवाह 

त्याकाळी लहान वयातच लग्न व्हायची. याच प्रथेमुळे जिजाऊंचं लग्न बालवयातच झालं. जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव आणि शहाजीराजे यांचे वडील मालोजीराजे ही दोघेही निजाम दरबारी काम करायचे. त्यामुळे एकदा लखुजी जाधवांच्या घरी एका कार्यक्रमात मालोजीराजे आणि शहाजीराजे आले होते. त्यावेळी त्यांच्या लग्नाची बोलणी झाली होती. 

देवगिरी किल्ला
देवगिरी किल्ला

इ.स. १६०९ साली देवगिरीच्या किल्ल्यात राजमाता जिजाबाई आणि शहाजीराजे भोसले यांचा विवाह सोहळा पर पडला. यांच्या लग्नात मूर्थजा निजमशाह पण हजर होता. 

माहेर आणि सासर

एकदा निजामच्या दरबारातून निघताना महाद्वारात खूप गर्दी जमली होती. अशातच खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला आणि लोकांना चिरडू लागला. 

अशावेळी त्या हत्तीला रोखण्यासाठी लखुजीराव जाधवांचा मुलगा दत्ताजीने त्या हत्तीला रोखण्यासाठी त्याच्यावर बाणांचा आणि भाल्यांचा मारा केला. हे सर्व थांबवण्यासाठी तिथे उपस्थित शहाजीराजांचे चुलतभाऊ संभाजी आणि खेलोजी दत्ताजींवर तुटून पडले. यात दत्ताजी संभाजीकडून मारले गेले. 

ही बातमी मालोजी राजेंपर्यंत पोहोचली आणि ते भोसल्यांवर चालून गेले. यात संभाजींना मारण्यासाठी आले होते आणि या युद्धात शहाजीराजे पण पडले. पण लखुजी राजांच्या तलवारी समोर शहाजी राजांचा निभाव लागला नाही. आणि ते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांनी संभाजीला ठार केला. 

जिजाऊंचा पुतळा अलौकिक मराठी
जिजाऊंचा पुतळा -सिंदखेड

या प्रसंगानंतर जाधव आणि भोसले घराण्यात तणाव निर्माण झाला. यात अडकल्या त्या राजमाता जिजाबाई. पण त्यांनी पतीशी एकनिष्ठ राहत माहेरशी आपले संबंध तोडले. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप अवघड गेला असावा. 

अपत्ये 

जिजाऊंना पहिला मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी दिराच्या नावावरून संभाजी असं ठेवलं. त्यांना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकी ४ दगावली (काही मतभेद आहे) आणि मग १६ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरीच्या भक्कम किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांच्या जन्मावेळी शहाजीराजे एका मोहिमेवर गेले होते. 

पुढील काही काळातच त्यांना पुत्रशोक पण आलं. आदिलशाह चा सरदार क्रूर अफजल खानान संभाजी राजांना मारलं होतं. 

जिजाऊ आणि शिवराय यांचा पुतळा -अलौकिक मराठी
जिजाऊ आणि शिवराय यांचा पुतळा -सौजन्य विकिपीडिया

शिवरायांच्या जन्मावेळी शहाजीराजांकडे पुण्याची जहागिरी होती. त्यामुळे बऱ्याच काळ राजमाता जिजाबाई आणि शिवराय ही शिवनेरीवर आणि नंतर पुण्यातील लाल महालात मुक्कामास होते. नंतर तिथूनच त्यांनी पुणे वतनदारिचा विकास करण्यास सुरुवात केली. 

स्वराज्य जननी जिजाऊ

जिजाऊंवर शिवरायांच्या शिक्षणाची पण जबाबदारी होती. लहानपणापासूनच त्यांनी शिवरायांना रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगत आल्या. याचा उपयोग पण शिवरायांना पुढे खूप झाला. नंतर त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. यात त्यांची मदत दादाजी कोंदडेव यांनी केली. आणि लहानपणापासूनच जिजाऊंनी शिवरायांच्या मनावर हिंदवी स्वराज्याची मोहर छापली होती. याच स्वप्नाला पुढे शिवरायांनी आकार दिला. 

जिजाऊंनी शिवरायांना एक सवय लावून ठेवली होती. जेव्हा पण त्यांच्या दरबारात एखादी स्त्री यायची त्यांची जी काही अडचण असायची ती तर सोडवली जायची पण सोबतच त्यांना साडी चोळी पण दिली जायची. ही साडी चोळी त्या शिवरायांच्या हस्ते त्यांना दिली जायची. अशाने त्यांना देण्याची सवय लावण्यात आली होती. पुढे ते अगदी शत्रूच्या घरातली जरी स्त्री त्यांच्या उंबरठ्यावर आली असली तरी त्यांना सन्मानाने सदी चोळी देण्यात यायची. 

याची सुरुवात काही मावळ्यांसह रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन केली. आणि मग त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी आदिलशाहितील सगळ्यात दुर्लक्षित किल्ला तोरणा स्वराज्यात सामील केला. यात मावळ खोऱ्यातील मावळ्यांनी साथ दिली. यांचं मार्गदर्शन पण जिजाऊंनी केलं. 

दुःख

या काळात शहाजीराजे मात्र शिवरायांसोबत नव्हते. शिवाय त्यांना पण खूप अडचणींना सामोरं जावं लागलं होते. कारण शहाजीराजे ही अजून पण आदिलशाह किंवा निजामशाह यांच्याकडेच काम करायचे. आणि शिवरायांनी जिंकलेल्या किल्ल्यांचं स्पष्टीकरण शहाजीराजांना द्यावं लागायचं. 

पुढे शहाजीराजे ही दक्षिण मोहिमेवर गेले आणि तिथेच तंजावर मध्ये त्यांनी दूसरा संसार केला. तिथे त्यांना व्यंकोजी नावाचा पुत्र पण झाला. 

नंतर काही काळाने त्यांचा मृत्यू झाला आणि इकडे जिजाऊंवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या सती जाण्यासाठी तयार  झाल्या होत्या पण शिवरायांनी त्यांना अडवलं. 

नंतर पण त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. मध्येच सगळ्यात मोठं संकट आलेलं म्हणजे मिर्झाराजे जयसिंगचं. त्यांच्या आक्रमनाने स्वराज्यातील किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. शिवाय शिवरायांना औरंगजेबाच्या दरबारात पण जावं लागलं जिथे त्यांच्या जीवाला पण मोठा धोका होता. पण बादशहाच्या हातावर तुरी देऊन ते निसटले. या काळात जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार सांभाळला. आणि मग एक एक करून किल्ले परत मिळवण्यास सुरुवात केली. 

स्वराज्य उभारणीच्या काळात जिजाऊंनी अनेक मुलं मिळवली आणि कित्येक तर गमावली पण. ज्यात तानाजी मालुसरे, शिवा काशिद  यांसारखी मुले होती. वेळोवेळी त्यांना या वेदना पण मिळाल्या. 

स्वराज्य अधिपती

नंतर त्यांनी शिवरायांचा स्वराज्याभिषेक सोहळा पण पहिला. खूप मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला होता. यात सोन्याच्या सिंहासनावर बसलेले शिवराय त्यांनी पाहिले. 

मृत्यू

पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवबांचा राज्यकारभार त्या पाहू शकल्या नाहीत. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या अवघ्या बारा दिवसांनीच त्या अनंतात विलीन झाल्या. रायगडच्या पायथ्याशी असलेला पाचाड गावातच त्यांचा मृत्यू झाला. 

जिजाऊ समाधी स्थळ पाचाड 
अलौकिक मराठी
जिजाऊ समाधी स्थळ पाचाड
google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

जिजामाता यांचा मृत्यू कधी झाला?

१७ जून १६७४ रोजी पाचाड इथे त्यांचा मृत्यू झाला.

जिजाऊंना किती मुलं होती?

जिजाऊंना एकूण दोन मुलं होती.

जिजाऊंच्या आईचं नाव काय आहे?

म्हाळसाबाई हे त्यांच्या आईचं नाव आहे.

जिजाबाईंनी शिवरायांना कोणाच्या कथा सांगितल्या?

जिजाबाईंनी शिवरायांना रामायण आणि महाभारताच्या कथा सांगितल्या होत्या.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला?

त्यांचा जन्म सन १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड इथे झाला.

Leave a Comment