आदित्य एल-१ ची माहिती | Aditya L1 Sun Mission Info Marathi

google-news-icon

इस्रोने आतापर्यंत चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहीम फत्ते केलेली आहे. शिवाय नुकताच चंद्रयान ३ पण यशस्वीपणे चंद्राकडे झेपावत आहे. आता इस्रो येत्या काळात सूर्यावर पण स्वारी करणार आहे. तो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ (Aditya L1)या उपग्रहाचा वापर करणार आहे. तर चला जाणून घेऊयात.

या मोहिमेचा खर्च हा जवळपास ३७८ कोटीपर्यंत असणार आहे. आदित्य एल १ हा उपग्रह इस्रोचा अंतराळातील पहिली प्रयोगशाळा असणार आहे. जी की सूर्याचा अभ्यास करणार आहे. हा उपग्रह पृथ्वी आणि सूर्याच्या मधील कक्षेत ठेवला जाणार आहे. हा langrange एल १ या बिंदुवर असणार आहे. या बिंदुचा उपग्रहाला खूप फायदा होणार आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर कक्षेत असणार आहे.

या बिंदुवर असल्याने त्याला एक फायदा असा आहे की तो २४ तास सूर्यावर लक्ष ठेवू शकतो. यात ग्रहणाचा किंवा पृथ्वीच्या सावलीत जाण्याचा अडथळा नसणार आहे.

आदित्य एल-१ (Aditya L1) काय करणार आहे?

आदित्य एल-१ (Aditya L1) वर ७ उपकरणे असणार आहेत. त्यापैकी ४ हे सूर्यावर लक्ष केंद्रित केलेले असतील. बाकीचे ३ उपकरणे त्या बिंदुजवळील कणांचा आणि त्याच्या क्षेत्राचा अभ्यास करतील. ते अंतराळातच त्याचा अभ्यास करून त्याची माहिती आपल्याला पाठवतील.

आदित्य एल-१ (Aditya L1) सूर्याच्या फोटोस्फीअर, क्रोमोस्फीअर आणि सूर्याच्या बाहेरील वातावरणाचा म्हणजेच करोनाचा अभ्यास करेल. यात तो electromagnetic आणि particle आणि magnetic field detectors यांचा वापर करेल.

आदित्य एल-१
img source isro

या मोहिमेत आदित्य एल-१ (Aditya L1)खालील गोष्टींचा अभ्यास करणार आहे:

  • Study of Solar upper atmospheric (chromosphere and corona) dynamics.
  • Study of chromospheric and coronal heating, physics of the partially ionized plasma, initiation of the coronal mass ejections, and flares
  • Observe the in-situ particle and plasma environment providing data for the study of particle dynamics from the Sun.
  • Physics of solar corona and its heating mechanism.
  • Diagnostics of the coronal and coronal loops plasma: Temperature, velocity and density.
  • Development, dynamics and origin of CMEs.
  • Identify the sequence of processes that occur at multiple layers (chromosphere, base and extended corona) which eventually leads to solar eruptive events.
  • Magnetic field topology and magnetic field measurements in the solar corona .
  • Drivers for space weather (origin, composition and dynamics of solar wind .

PSLV या इस्रोच्या सर्वात यशस्वी रॉकेटद्वारे याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या यानाचं एकूण वजन हे १४७५ किलोग्राम एवढे आहे. त्यापैकी यावर जे सात उपकरणे बसवली आहेत त्यांचं वजन हे २४४ किलोग्राम एवढं आहे. याचा कार्यकाळ हा ५ वर्ष असणार आहे. या मोहिमेसाठी एकूण खर्च ३८० कोटी एवढा लागला आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Langrange point म्हणजे काय?

langrange point

हा बिंदु म्हणजे जिथे दोन खगोलीय वस्तूंचा गुरुत्वीय बळ सारखा होतो जेणेकरून एखादी लहान वस्तु किंवा उपग्रह हे त्याच ठिकाणी राहतील. यामुळे त्या उपग्रहाला त्या ठिकाणी राहण्यासाठी लागणारं इंधन पण कमी लागेल.

आदित्य एल-१ (Aditya L1) लॉंचची तारीख काय?

आदित्य एल-१ (Aditya L1) २ सप्टेंबर २०२३ ला लॉंच केलं जाणार आहे.


Leave a Comment

Hubble Telescope Facts Marathi प्रज्ञान रोव्हर | Pragyan Rover on Moon marathi