धूमकेतूची माहिती मराठी | Meteor Information in Marathi

google-news-icon

काही ठरावीक कालावधीनंतर सूर्याला भेट देणारे हे अवकाशातले गोळे म्हणजेच धूमकेतू होत. हे सतत सूर्याकडे येतात. यांच्या शेपटाकडील भाग पिसाऱ्यासारखा दिसतो. याच्या पिसाऱ्यामुळे याला प्राचीन ग्रीक लोक अॅस्टर कॉमेट म्हणजेच केसाळ तारा म्हणत. पण आता फक्त कॉमेट हा शब्दच उरला आहे.

धूमकेतूंची रचना

कधीकधी धूमकेतूच्या केंद्रस्थानी तेजस्वी ताऱ्यासारखा ठिपका असतो. त्याला न्यूक्लिअस असं म्हणतात. याच्याभोवती विखुरलेल्या अस्पष्ट प्रकाशाला कोमा असे नाव आहे. एका बाजूकडून दिसणाऱ्या प्रकाशाच्या लांब शलाकेला शेपूट म्हणतात.

a meteor is seen in the space passing by earth moving toward sun

फ्रेड लॉरेन्स व्हिपल या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाने असे सुचविले की, इतक्या दूरवरचे वातावरण अतिशय थंड असेल त्यामुळे हे दूरवरचे धूमकेतू पृथ्वीच्या वातावरणात वायुरुपच असतील. हे धूमकेतू अमोनिया, मिथेन आणि कायनोजेन (कार्बन आणि नायट्रोजन ) या सर्व बर्फासारख्या घन स्वरुपातील वायूचे बनलेले असतील. धूमकेतूंमध्ये बर्फ किंवा गोठलेले पाणीही असू शकेल.

या सर्व गोठलेल्या साहित्यात दगडाच्या सूक्ष्म कणांचादेखील समावेश असेल. कदाचित याचा गाभा दगडाचा असेल किंवा नसेल.

धूमकेतूंचे उगमस्थान

जॉन हेडी ऊर्ट या डच खगोलशास्त्रज्ञाने अनेक धूमकेतूंच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढला की, धूमकेतूंच्या कक्षा फारच लंबगोलाकृती आहेत. आपल्या कक्षेच्या सीमेजवळून ते सूर्याला फेरी मारून परत आपल्या कक्षेकडून जातात. साधारण बहुतेक धूमकेतूंची कक्षा ही साधारण एक लाख खगोलीय एकक एवढी आहे. तसेच धूमकेतू सूर्यमालेत एकाच दिशेतून प्रवेश न करता कोणत्याही दिशेतून प्रवेश करतात.

यावरून ऊर्ट या शास्त्रज्ञाने असे सुचविले की सूर्यापासून सुमारे 50,000 खगोलीय एकक अंतरावर एक धूमकेतूंचा मेघ आहे, जिथे ते उगम पावतात. सूर्यापासून इतक्या लांब असल्याने हे ताऱ्यादरम्यानच्या प्रदेशातून येतात असे म्हटले पाहिजे. ही कल्पना जर बरोबर असेल तर धूमकेतूंतून आपल्याला अशा प्रदेशाची माहिती मिळेल. काही धूमकेतूंचे सखोल निरीक्षण करण्यात आले असून त्यांत अनेक प्रकारचे रासायनिक आणि कार्बनिक रेणू सापडले आहेत.

उल्कावर्षाव म्हणजे काय?

जेव्हा धूमकेतू सूर्याला भेटायला येतात तेव्हा ते पृथ्वीच्या कक्षेला दोन ठिकाणी छेदतात. धूमकेतू जेव्हा येतो, तेव्हा तो त्याच्यासोबत धूळ व कचरा घेऊन येतो. तो कचरा, धूमकेतू ज्या मार्गाने येतो त्या मार्गात साचतो. मग अशा प्रकारे हा कचरा पृथ्वीच्या कक्षेत दोन ठिकाणी साचतो. मग ज्यावेळी पृथ्वी या कचऱ्यातून मार्गक्रमण करते, तेव्हा तिच्या गुरुत्वाकर्षणाने तो कचरा तिच्याकडे खेचला जातो. हा कचरा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा तो घर्षणाने जळतो आणि चमकतो. मग त्या कचऱ्यात धूळ, मातीचे व दगडाचे कण असतात जे चमकतात. असे भरपूर एकाच रात्री शंभर- दीडशे दिसतात यालाच उल्कावर्षाव म्हणतात.

meteor shower

धूमकेतूंचे हल्ले

धूमकेतूंचे हल्ले हे फार घातक असतात.

1) शू मेकरे लेव्ही या जोडप्याने शोधलेल्या या धूमकेतूला यांचेच नाव देण्यात आले. शास्त्रज्ञांनी असा बिनचूक अनुमान लावला की, 1992 साली हा धूमकेतू आदळेल ! तसे झाले पण ! गुरुवर आदळण्यापूर्वी या धूमकेतूंचे 21 लहानमोठे तुकडे झाले होते व ते जुलै महिन्यात 1992 साली गुरुवर आदळले. यामुळे गुरुच्या दक्षिण गोलार्धात गुरुवर काही काळे ठिपके दिसू लागले. हे ठिपके दोन वर्ष दिसत होते आणि त्यांचा आकार पृथ्वी एवढा होता.

जर धूमकेतू आदळला तर ?

जर एखादा धूमकेतू पृथ्वीवर आदळला तर पृथ्वीचा टवकाच निघेल म्हणजेच पृथ्वीचा तो भूभाग नष्ट होईल. तेथील जीवसृष्टी नष्ट होऊन जाईल. जरी पृथ्वीवर धूमकेतूमुळे प्रचंड खड्डा पडला तरी पृथ्वी आपल्या कक्षेत फिरत राहील.

पण पृथ्वीवासियांसाठी ही सर्वात मोठी शोकांतिकाच असेल. कारण त्या टकरीमुळे प्रचंड उष्णता निर्माण होईल, त्यात वातावरण निघेल. त्या ज्वलनक्रियेत ऑक्सिजन संपुष्टात येईल. प्रचंड वादळे, वाढते तापमान, अतिवृष्टी यांपासून संरक्षण करत आलेली ही जीवसृष्टीफार काळ टिकू शकणार नाही.

लोणार सरोवर

बुलडाणा जिल्हयातील ह्या चिमुकल्या गावात काहीतरी असामान्य आहे याची बहुतेक पर्यटकांना माहिती नाही.1830 मीटर व्यासाचे आणि 150 मी खोल असे हे एक सरोवर आहे. पण ते इतर तळ्यापेक्षा वेगळे आहे, कारण ते एका विलक्षण घटनेतून निर्माण झालेले आहे.

आपल्या सूर्यमालेत नवग्रह, उपग्रह, धूमकेतू, लघूग्रह इत्यादी खगोलीय वस्तू आहेत. व हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.

विशेष करून मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान असलेल्या लघुग्रहाच्या पट्टयात हजार किमी व्यासाचे लघुग्रह आहेत . त्यातील काही लघुग्रह पृथ्वीव मंगळापर्यंत झेप मारतात . व त्यांचा व्यास सामान्यपणे दहा किमी पेक्षा मोठा नसतो. शिवाय काहीमीटर व्यासाचे लहानमोठे अशनी देखील इकडे दाखल होतात. लहान तुकडे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्या वातावरणात दाखल होतात आणि घर्षणामुळे ते चमकतात.

पण हे फार मोठे नसतात. दहा ते वीस सेमी व्यासाचा दगड पडणे आणि साठ मी व्यासाचा दगड पडणे यात फरक आहे. लोणार सरोवर हे अशाच अशनीच्या पडण्यामुळे निर्माण झाले आहे. त्या अशनीचे वजन दोन कोटी टन इतके असावे. अशनीच्या पडल्यामुळे जी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली, त्याच्यामुळे जमीन वितळली गेली आणि हे सरोवर निर्माण झाले असावे .

मूळ अशनी मात्र बाष्पीभूत झाला असणार. पण त्याचा गाभा जमिनीत खोल रुतून बसला असणार हे नाकारता येणार नाहीच. लोणारच्या तपासणीतून असे लक्षात आले की , त्याच्या पाण्यात अधिक प्रमाणात क्षार आणि इतर रासायनिक द्रव्ये आहेत हे दिसून आले आहे.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment

facts about earth marathi सुपरमून म्हणजे काय?