मत्स्य ६०००: गरज काय समुद्रयान मोहिमेची? | Matsya 6000

google-news-icon

इस्रो सध्या नवनवीन यशाला गवसणी घालत आहे. चंद्रयान ३ झालं, आदित्य एल १ झालं आता समुद्रात स्वारी करणार आहे इस्रो. सध्या तुम्ही पण सगळीकडे एकच बातमी ऐकत असाल की इस्रो आता समुद्रात एक यान पाठवणार आहे. याला समुद्रयान किंवा मत्स्य ६००० असे याचे नाव आहे. चला याच्या बद्दल जाणून घेऊयात पूर्ण माहिती.

मत्स्य ६००० बद्दल पूर्ण माहिती – Matsya Mission Information Marathi

सध्या भारत हा समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करणार आहे. या मोहिमेत भारत समुद्रात ६००० मीटर खोल जाणार आहे. म्हणून या मोहिमेचं नाव हे मत्स्य ६००० आहे. बरं मत्स्य म्हणजे मासा हे तर तुम्हाला माहीतच असेल.

मत्स्य ६००० | Matsya 6000 Samudrayaan
photo: Twitter-@KirenRijiju

पण त्याआधी या यानाची २०२४ मध्ये बंगालच्या उपसागरात ५०० मीटर खोल जाऊन परीक्षण केले जाणार आहे. मग त्यानंतर २०२६ मध्ये हे यान तीन संशोधकांसह समुद्रात सोडले जाणार आहे. ज्यात ते ६००० मीटर खाली समुद्रात संशोधन करतील. या मोहिमेला २०२१ मध्येच भारत सरकार तर्फे मान्यता देण्यात आली होती. सुमारे चार हजार सत्याहत्तर कोटी या मोहिमेसाठी पण देण्यात आले होते.

हे मत्स्य ६००० खूप मजबूत बनवले गेले आहे. याला बनवण्यासाठी ८० मिलीमीटर टायटॅनियम या संमिश्र धातूचा वापर केला आहे जो अॅल्युमिनियम पेक्षा हलका असतो आणि त्याच्या पेक्षा मजबूत असतो. मत्स्य ६००० गोलाकार स्वरूपात बनवले गेले आहे. मत्स्य ६००० चा व्यास हा २.१ मीटर एवढा आहे. यात तीन संशोधक बसतील एवढी यात जागा आहे. शिवाय मत्स्य ६००० मध्ये दाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपकरणे बसवली आहेत. Proportion System, Control and communication System, Launching and Recovery System अशी उपकरणे मत्स्य ६००० मध्ये बसवली आहेत.

मत्स्य ६००० Samudrayaan
photo- Twitter @KirenRijiju

मत्स्य ६००० १२-१६ तास न थांबता प्रवास करू शकतं. सोबतच यात ९६ तास पुरेल एवढा ऑक्सिजन यात दिला आहे. हे एवढे मजबूत आहे की सामान्य दाबापेक्षा ६०० पट जास्त दाब हे सहन करू शकते. ज्यामुळे समुद्राच्या ६००० मीटर खोल मध्ये पण यावर काहीच परिणाम होणार नाही. उदाहरण द्यायचं झालं तर जून २०२३ मध्ये एका पाणबुडी सोबत समुद्रात एक अपघात झाला होता असा काही प्रकार या यानासोबत होणार नाही. त्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

याआधीही भारताने समुद्रात मोहिमा केल्या आहेत. भारताने याआधी तीन वेळा समुद्रात पानबुड्या पाठवल्या आहेत. पण यावेळी काय खास आहे? यावेळी या मोहिमेत तीन संशोधक पण जाणार आहे. भारतद्वारे माणूस समुद्रात पाठवण्याची ही पहिली मोहीम आहे म्हणून ही खास आहे. अमेरिका, रशिया, जपान, फ्रांस आणि चीन नंतर समुद्रात माणूस पाठवणारा भारत सहावा देश ठरेल.

मत्स्य ६००० मोहीम कशासाठी?

कोबाल्ट, निकेल, पोलिमेटॅलीक, गॅस हायड्रेट्स, थर्मल सल्फाइड इतर खनिजे हे समुद्राखाली सापडतात ज्यांचा वापर हा मोबाईल, लॅपटॉप अशी उपकरणे तयार करण्यासाठी होतो.

शिवाय सध्या विजेवर चालणाऱ्या गाड्या खूप जोर धरत आहेत. त्यासाठी जी बॅटरी लागते त्यात कोबाल्ट निकेल आणि लिथियम यांचा प्रामुख्याने वापर होतो. हे खनिजे समुद्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. कार तयार करण्यासाठी लागणारं मॅंगनीज पण समुद्रात सापडतं. एका अहवालानुसार पुढील तीन वर्षात जगाला दुप्पट लिथियम आणि ७० टक्के जास्त कोबाल्ट लागणार आहे. तर २०३० पर्यंत पाच पट जास्त लिथियम आणि चार पट जास्त कोबाल्ट लागणार आहे.

सध्या यांची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी त्यामुळे यांचे स्रोत समुद्रात शोधण्यासाठी ही मोहीम आखली जात आहे. ज्या दरम्यान समुद्रात या खनिजांसाठी खोदकाम केले जाणार आहे.

संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे त्याच्यानुसार फक्त काहीच देशांना समुद्रात खोदकाम करण्याची परवानगी दिली आहे. त्यात चीन, रशिया, दक्षिण कोरिया, भारत, ब्रिटन, फ्रांस, पोलंड, इंग्लंड, ब्राजील, जपान जमैका, नौरु, टोंगा,कारीबाटी आणि बेल्जियम ही देश आहे ज्यांना परवानगी आहे.

पण याव्यतिरिक्त असेही काही देश आहेत जे समुद्रात खोदकाम करण्यासाठी विरोध करत आहेत. त्यांच्या मते अशा मोहिमांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.

मत्स्य ६००० ची वैशिष्ट्ये

  • भारताच्या ब्ल्यु इकॉनमीला चालना देणं
  • सागरी संसाधनांचा शोध घेणं
  • खोल समुद्रातील ऑपरेशनसाठी तंत्रज्ञान विकसित करणं
google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

आकाशगंगा आणि त्यांचे प्रकार

आकशगंगांचे प्रकार

AI म्हणजे काय?

AI म्हणजे काय?

Leave a Comment

आदित्य L1 ची माहिती Best laptops Under 50000