मंगळ ग्रहावरीलवरील दिवस कमी होतोय ! | Mars is Spinnig Faster

google-news-icon

मंगळ हे नाव गेली खूप वर्षे तुम्ही ऐकत असालच. कारण याला आपण आपलं भविष्यातील घर म्हणून बघत आहोत. तर याच्या बाबतीत सध्या एक नवी बातमी येत आहे. तर चला याच्याबद्दल जाणून घेऊयात.

मंगळाचं स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे
Credit: NASA/JPL-Caltech/UArizona

मंगळाचं डुगडुगणं – Mars Wobble

नासाने २०१८ मध्ये मंगळावर एक लँडर पाठवला होता. याच्याच मदतीने त्यांनी काही गोष्टी जगासमोर आणल्या आहेत. तर शास्त्रज्ञांना असं समजलं आहे मंगळाचा दिवस कमी होत आहे. शास्त्रज्ञांनी मंगळाच्या फिरण्याबाबत खूप बारकाईने निरीक्षण केले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा ग्रह डुगडुगतो(wobble) आहे.

मंगळाच्या डुगडुगण्याचं कारण म्हणजे त्याचा वितळलेल्या स्वरूपातील गाभा आहे. याचा गाभा हा काही समान घनत्वाचा (density) नाही. यामुळे हा गाभा त्या भागात खूप हलतो. जसे जर तुम्ही एखादा पाण्याचा हंडा जो की थोडा रिकामा आहे त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असाल तर त्यावेळी त्यातील पाणी ज्याप्रमाणे हालेल तसंच काही मंगळाच्या गाभ्यातील द्रव्यासोबत होत आहे.

याच्या द्रव्य गाभ्याची त्रिज्या ही १७८९-१८०० किमी याच्या दरम्यान असू शकते. हेही याच प्रयोगामध्ये कळले आहे.

या सर्वाचा शोध नासाच्या इनसाइट लँडर याच्यामुळे लागला आहे. जो की २०१८ मध्ये पाठवला होता. ज्याने या ग्रहावर चार वर्षे पूर्ण केली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये बॅटरी चार्ज नसल्यामुळे बंद पडला. याच्या सोलार पॅनल वर खूप माती जमा झाली होती यामुळे त्याच्या बॅटरी चार्ज झाल्या नाहीत यामुळे तो बंद पडला.

प्रयोग

संशोधकांनी ‘Lander’s Rotation and Interior Structure Experiment‘ (RISE) या उपकरणाच्या मदतीने ज्याच्या मध्ये काही रेडियो ट्रांसपॉंडर आणि अँटेना बसवलेले आहेत. याच्या मदतीने मंगळावर नासाच्या डीप स्पेस नेटवर्क च्या मदतीने काही सिग्नल्स पाठवले जायचे मग ते सिग्नल्स याला मिळवल्यावर ते परत पृथ्वीवर पाठवले जायचे मग यांच्या जे डॉप्लर फरक यायचा याच्या मदतीनेच नासाच्या शास्त्रज्ञांना हा ग्रह किती वेगाने फिरत आहे आणि हा किती डुगडुगत आहे हे कळायला मदत झाली.

खरं तर हा प्रयोग करणं पण खूप अवघड होतं. कारण हे जे रेडियो सिग्नल असतात यांच्यावर पाण्याचा पण प्रभाव पडतो. शिवाय पृथ्वीच्या वातावरणात पण खूप प्रमाणात ओलावा आहे याचा पण यावर परिणाम होत होता. यासोबतच सौरवादळ, अवकाशातील इलेक्ट्रॉंस, प्रोटॉन्स यांचा पण यावर प्रभाव पडतो.

मंगळचा दिवस किती वेळाने कमी झाला आहे

या प्रयोगावरून शास्त्रज्ञांना मंगळ हा दरवर्षी ४ milliarcseconds प्रति वर्ष या वेगाने अधिक(accelerate होत आहे) स्वतः च्या अक्षाभोवती फिरत आहे. ही सर्व माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांनी ९०० मंगळ दिवसाच्या माहितीचा अभ्यास केला आहे. जि की त्यांना या इनसाइट लँडर कडून मिळाली आहे.

१ arcseconds म्हणजे ०.०००२ डिग्री असते. तर याचा १००० वा भाग म्हणजे खूप कमी होतो. हा फरक खूप कमी आहे पण हा प्रयोग किती बारकाईने केला आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. यामुळे मंगळचा दिवस हा ७.६ x १०-४ मिलीसेकंद प्रति वर्ष या वेळाने कमी होत आहे.

मंगळाचा दिवस कमी होण्याचं कारण

याचा दिवस कमी होण्यामगचं खरं कारण आतापर्यंत तरी शास्त्रज्ञांना कळलं नाही पण त्यांनी काही अंदाज बांधले आहेत ते असे: –

  • याच्या ध्रुवीय भागावर बर्फ हा सतत बदलत आहे. यामुळे याच्या पृष्ठभागावरील वस्तुमान हे बदलत आहे.
  • याच्यावर आधी ज्या हिमनद्या आधी होत्या त्यांच्या वाहण्यामुळे यावरील जमीन खूप दाबली गेली होती जी आता वर येत असावी यामुळे कदाचित हे होत असावे.
  • मंगळ ग्रहाचा जो द्रव्य गाभा आहे तो समान घनत्वाचा नाही त्यामुळेही कदाचित हे होत असावे.

याबतीत सर्व माहिती ही नासाच्या शास्त्रज्ञांनी नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध केली आहे तुम्ही इथे क्लिक करून वाचू शकता.

google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

मंगळाच्या द्रव्य गाभ्याची त्रिज्या किती आहे?

याच्या द्रव्य गाभ्याची त्रिज्या ही १७८९-१८०० किमी याच्या दरम्यान असू शकते.

मंगळ ग्रहाचा दिवस किती वेळाने कमी होत आहे?

मंगळचा दिवस हा ७.६ x १०-४ मिलीसेकंद प्रति वर्ष या वेळाने कमी होत आहे.

मंगळाच्या पृष्ठभागावर नासाने कोणते यान पाठवले होते?

याच्या पृष्ठभागावर नासाने २०१८ साली इनसाइट लँडर हे यान पाठवले होते.

Leave a Comment

१० तेजस्वी तारे Voyager 2 अखेर संपर्क साधला