व्यास- 3,474km
अंतर -3,84,400 सरासरी
परिवलन -27.3217 दिवस
परिभ्रमण -27.3217 दिवस ( पृथ्वीभोवती )
मुक्तिवेग -2.2km/s
चंद्र निर्मिती सिद्धांत
चंद्र निर्मितीचे वेगवेगळे सिद्धान्त आहेत. पण दोन प्रमुख सिद्धान्त आहेत. सध्या त्यातील एक बाद करण्यात आला आहे. त्यातील दुसरा प्रश्नांनी भरलेला आहे.
चंद्रनिर्मितीचा आघात सिद्धांत
या सिद्धान्तानुसार जेव्हा पृथ्वी नुकतीच तयार झाली होती म्हणजेच आगीचा गोळा होती त्यावेळी तिला एक मंगळाच्या आकाराएवढी एक वस्तू येऊन आदळली. ती वस्तू आदळल्यामुळे पृथ्वीतलं द्रव्य ( मॅटर ) बाहेर अवकाशात फेकलं गेलं व गुरुत्वाकर्षणामुळे ते द्रव्य पृथ्वीभोवती फिरू लागलं. तोच पुढे चंद्र बनला. पण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 3/244 पट आहे. इतर ग्रहांचे उपग्रह आपपल्या ग्रहांपेक्षा याहून पुष्कळच ‘ हलके ‘ आहेत. शिवाय चंद्रात लोखंडाचे प्रमाण फारच कमी आहे आणि त्याचे इतर काही रासायनिक घटक पण पृथ्वीपेक्षा वेगळे आहेत. ‘ अपोलो ‘ मालेतील अंतराळस्वाऱ्यांतून चंद्रावरून आणलेल्या मातीच्या विश्लेषणावरूण हे निष्कर्ष गिघाले. म्हणून चंद्र हा पृथ्वीच्याच एका भागातून निर्माण झाला असावा असे मानण्यास जागा राहिली नाही.
2) दुसऱ्या सिद्धान्तानुसार चंद्र पृथ्वीच्या जवळून जात होता त्यावेळी पृथ्वीने आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने त्याला आपल्याकडे खेचून घेतले. असा हा सिद्धान्त आहे. या सिद्धान्तावर काही प्रश्न आहेत. चंद्र कुठे निर्माण झाला? पृथ्वीच्या कक्षेत केव्हा स्थिरावला? असे काही प्रश्न आहेत.
चंद्र कसा निर्माण झाला हे माहित नाही पण चंद्राचा फायदा मात्र आपल्याला झाला. चंद्रामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती कमी झाली. म्हणजे जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा ती 8 तासात स्वतःभोवती एक फेरी मारायची. जेव्हा चंद्राची निर्मिती झाली तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे दर शतकाला पृथ्वीची गती दीड – दोन मिली सेकंद कमी होऊ लागली. आता तिची गती 24 तास आहे. पृथ्वीच्या या मंदावणाऱ्या वेगाचा परिणाम अर्थातच चंद्रावर होणारच ! या एकमेकांच्या भरती ओहोटीच्या तणावामुळे चंद्राची कक्षा दरवर्षी 3.8 सेंटीमीटरने पृथ्वीपासून दूर जात आहे.
आपण चंद्राची 42 कोटी वर्षांपूर्वीची स्थिती पाहू –
42 कोटी वर्षांपूर्वी चंद्राला एक पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी केवळ 9.3 दिवस लागत होते. आज काळ 27.3 दिवसांचा आहे.
सध्याचे चंद्राचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर 3 लाख 84 हजार किमी आहे. 42 कोटी वर्षापूर्वी ते सुमारे 1 लाख 70 हजार किमी असावे. आजच्यापेक्षा त्याकाळी चंद्र अर्ध्याहून कमी अंतरावर होता. त्यामुळे येणाऱ्या भरती ओहोटचे जबरदस्त तडाखे त्याकाळी पृथ्वीला बसत असावेत.
सुपरमून
भरपूर वेळेस आपण सूपरमून विषयी ऐकलं असेलंच. नाववरून वाटते की चंद्रकिती पट मोठा दिसणार आहे. पण तसं काही नसतं. त्या दिवशी चंद्र फारसा मोठा दिसत नाही. तो थोडासा मोठा दिसतो. हा फरक त्यांनाच कळतो जे दर पौर्णिमेचा चंद्र पाहतात. खरं तर या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो.
चंद्रावरील मोहिमा
चंद्रावर आतापर्यंत फक्त चार देश त्यांचं यान उतरवण्यात यशस्वी झाले आहेत. यात नुकताच २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारत पण सामील झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन हे देश पण चंद्रावर उतरले आहेत. भारताचं चंद्रयान ३ हे यान आहे जे चंद्रावर उतरले आहे आणि १४ दिवस त्याच्या मातीचं परीक्षण करून माहिती आपल्याला पाठवणार आहे.
याआधी भारताने चंद्रयान १ २००८ साली पाठवले होते पण त्यात फक्त एक ऑर्बीटर होता ज्याचं काम चंद्राच्या कक्षेत राहून त्याच्याबद्दल माहिती पाठवण्याचं होतं. याच्या मदतीने चंद्रावर पाणी आहे हा शोध लागला ज्याने इस्रोची जगभरात दखल घेतली गेली.
तर २०१९ साली पाठवलेलं चंद्रयान २ हे ९५ टक्के यशवी झालं होतं. या मोहिमेत विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यात अयशस्वी ठरलं होतं.
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!