सॅम माणेकशॉ (बहादूर) माहिती मराठी | Sam Manikshaw(Bahadur) Information in marathi

google-news-icon

सॅम माणेकशॉ (बहादूर) थोडक्यात माहिती

सॅम माणेकशॉ (बहादूर) यांचं पूर्ण नाव सॅम होरमुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ असं आहे. त्यांना सॅम बहादूर या नावाने पण ओळखले जातं. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ साली अमृतसर पंजाब इथे ब्रिटिश काळात झाला होता. त्यांचा जन्म हा एका पारसी घराण्यात झालेला ज्यांनी लष्करासाठीच कार्य केलेलं.

भारत पाकिस्तान यांच्यात १९७१ साली झालेल्या युद्धात ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. आणि ते पहिले होते ज्यांना ‘फील्ड मार्शल’ हे पद मिळाले होते. चार दशकं आणि पाच युद्ध त्यांनी लष्करासाठी दिले होते. याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धात झाली होती.

१९३२ साली सॅम माणेकशॉ (बहादूर) यांनी डेहराडून मध्ये लष्करात प्रवेश केला. त्यांना पुढे वेगवेगळ्या पदावर बढती देण्यात आली होती. त्यांना वेगवेगळ्या बटालियनचं प्रमुख करण्यात आलं होतं. ब्रिगेडियर, १९५२ मध्ये कमांडर नंतर डायरेक्टर ऑफ मिलिटरी ट्रेनिंग अॅट आर्मी हेडक्वार्टर्स मध्ये पण नेमणूक करण्यात आली.

सॅम माणेकशॉ (बहादूर) लष्करी आयुष्य

दुसऱ्या महायुद्धात बर्मा इथे झालेल्या लढाईत ते खूप जखमी झाले होते. पण त्यांनी हार मानली नव्हती यामुळे त्यांना मिलिटरी क्रॉस ऑफ गॅलँटरी ने सन्मानित करण्यात आलं होतं. १९४७ च्या भारताच्या फाळणी नंतर त्यांनी भारतीय लष्करासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे ते आठव्या गोरखा रायफल्स मध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली.

command positions, including as the director of military training, the commandant of the Defence Services Staff College, Wellington, the general officer commanding of the 26th Infantry Division, आणि the general officer commanding-in-chief of the Western Command आणि the Eastern Command अशा वेगवेगळ्या पदावर ते कार्यरत होते.

१९६२ साली चीन आणि भारतात झालेल्या युद्धात आणि १९६५ साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धात सॅम माणेकशॉ (बहादूर) यांनी केलेल्या नेतृत्वामुळे १९६९ मध्ये त्यांना भारतीय लष्कराचे प्रमुख बनवले. त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय लष्कर हे आधुनिक सैन्य म्हणून उदयास आले. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी खूप धाडसी निर्णय घेतले होते. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती.

याचा परिणाम म्हणून पाकिस्तानच्या ९०,००० सैनिकांना शरण यावं लागलं होतं यामुळे १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तान हा स्वतंत्र बांग्लादेश म्हणून तयार झाला. आणि ९०,००० सैनिकांनी एकच वेळी शरण येणं ही जगाच्या पाठीवर पहिलीच घटना होती. सॅम माणेकशॉ (बहादूर) यांच्या या कामगिरीसाठी त्यांना पद्मविभूषण हे पदक देण्यात आलं. जे भारतरत्न नंतर दुसरं सर्वात मोठा सन्मान आहे. १९७३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. यावेळी ते फील्ड मार्शल या पदावर होते. ते एक फाइव स्टार रॅंक ऑफिसर होते ही रॅंक मिळवणारे फक्त दोनच ऑफिसर झाले आहेत.

निवृत्तीनंतर सॅम माणेकशॉ (बहादूर) तमिळनाडू मधील कोनूर मध्ये राहण्यासाठी गेले. त्यांनी तिथे वेगवेगळ्या सामाजिक कार्यात पण सहभाग केला. सॅम माणेकशॉ (बहादूर) यांनी एक पुस्तक पण लिहिलं होतं The Man Who Bombed Karachi या नावाने. २७ जून २००८ साली वयाच्या ९४ व्या वर्षी तामिळनाडू मध्येच त्यांची जीवनयात्रा संपली. त्यांना लष्करी प्रबंधात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सॅम माणेकशॉ (बहादूर) यांचा जीवनप्रवास

 • १९१४ : अमृतसर, पंजाब, भारत येथे जन्म
 • १९३४ : भारतीय सैन्यात दाखल
 • १९३९-१९४५ : कोहिमाची लढाईसह दुसऱ्या महायुद्धात सेवा
 • १९४६ : भारताला स्वातंत्र्य मिळाले
 • १९४७ -१९४८ : १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सेवा
 • १९६२ : चीन-भारत युद्धादरम्यान चौथ्या पायदळ विभागाचे नेतृत्व
 • १९६९ : भारतीय सैन्याचे थलसेनाध्यक्ष म्हणून नियुक्ती
 • १९७१ : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व करून बांगलादेशची मुक्तता केली
 • १९७३ : फील्ड मार्शल पदोन्नती, हे पद धारण करणारे पहिले भारतीय अधिकारी
 • १९७३ -१९७५ : भारताचे संरक्षण दल प्रमुख म्हणून सेवा
 • २००८ : ९४ वर्षां वयात निधन
 • कोहिमाच्या लढाईत वीरतेसाठी मिलिटरी क्रॉस प्रदान करण्यात आला
 • “सॅम बहादूर” म्हणून लोकप्रिय
 • फील्ड मार्शल पदोन्नती मिळणारे पहिले भारतीय अधिकारी
 • 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेशची मुक्तता करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली
 • त्यांच्या चमकदार लष्करी धोरणांसाठी, त्यांच्या शौर्यासाठी आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात
google-news-icon

मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!

Leave a Comment