स्वामी विवेकानंद माहिती मराठी | Swami Vivekanand Information Marathi
स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या महान संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा संपूर्ण जगाला परिचय करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
नाद अन् माज मराठीचा
स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या महान संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा संपूर्ण जगाला परिचय करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
राजा राममोहन रॉय यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात सर्वप्रथम धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या कार्याचा पाया घातला. ‘आधुनिक भारताचा निर्माता’ या उपाधीने त्यांना गौरविले जाते.
यांसारख्या काव्यपंक्तींतून आपल्याला मानवधर्म शिकविणाऱ्या साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे आहे. त्यांचा जन्म २४ डिसेंबर, १८९९ रोजी कोकणातील पालगड या गावी झाला.
तुकडोजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधले जाते. त्यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर (ब्राह्मभट) असे होते. त्यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी २९ एप्रिल, १९०९ रोजी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती
समर्थ रामदासांचा जन्म शके १५३० (इ. स. १६०८) मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्याजीपंत तर आईचे नाव राणूबाई असे होते.
संत तुकारामांचा जन्म शके १५२० मध्ये (इ. स. १५९८) देहू या गावी झाला. (काही- जण त्यांचा जन्म शके १५३० मध्ये झाला असे मानतात.) तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई असे होते.
महाराष्ट्रात भागवत धर्माची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य इसवी सनाच्या सोळाव्या शतकात संत एकनाथ यांनी केले. त्यांच्या जन्मतिथीबद्दल विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही.
महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील आणखी एक महान संत म्हणून संत नामदेवांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म शके ११९२ (इ. स. १२७०) मध्ये पंढरपूर येथे झाला.
संत ज्ञानेश्वर यांचा जन्म शके ११९७ (इ. स. १२७५) मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.