father of supercomputer in india, param 8000 supercomputer made by, how many supercomputer in india,
सध्याच्या काळात जवळपास सगळेच जण संगणकाचा वापर करतात. त्यांच्या आयुष्यातील छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या कामासाठी. पण सुपर कॉम्प्युटरची गरज ही शास्त्रज्ञांना भासते. तेही मोठमोठे गणिते आणि समीकरणे सोडवण्यासाठी. ही अशी समीकरणे जर ते साध्या संगणकावर सोडवू लागले तर तो संगणक सुरुवातीलाच जीव सोडेल. सध्याच्या युगात अनेक देश सुपर कॉम्प्युटर वापरत आहेत. तर चला मग जाणून घेऊयात या सुपर कॉम्प्युटर बद्दल.
सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय असतं?
साधारण संगणक हे एका cpu वर काम करतात तर सुपर कॉम्प्युटर हे एका पेक्षा जास्त cpu वर काम करतात. यामुळे त्यांचा वेग हा खूप जास्त असतो आणि जास्तीत जास्त बरोबर माहिती देतात. त्यामुळे शास्त्रज्ञ गणिते आणि समीकरणे सोडवण्यासाठी वापरतात.
सुपर कॉम्प्युटर ची गरज का असते?
तुम्ही साधारणतः जो एक संगणक वापरता तो कमी माहिती वर प्रक्रिया करण्यासाठी बनवलेला असतो. जी की आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते आणि आपल्यासाठी तो कामाचा असतो. पण शास्त्रज्ञांना हे संगणक काहीच उपयोगाचे नसतात. त्यांच्याकडे जी माहिती असते त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांना जास्त कार्यक्षम अशा संगणकाची गरज असते. जे की एक साध्या संगणकाने होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना गरज भासते ती एक सुपर कॉम्प्युटरची. त्यासाठीच सर्व राष्ट्रे ही स्वतःची संगणक बनवतात किंवा एखाद्या देशकडून विकत घेतात.
भारताला अशा संगणकाची गरज का भासली?
सन १९८८ साली भारताने अमेरिकेकडे अशा कॉम्प्युटरची मागणी केली होती. पण अमेरिकेला वाटले की भारत न्यूक्लियर हत्यारे बनवण्यासाठी याचा वापर करेन. त्यामुळे त्याने दुय्यम दर्जाचा संगणक भारताला देऊ इच्छिला. पण भारताला हवामान अंदाज वर्तवण्यासाठी याचा वापर करायचा होता. पण अमेरिकेच्या या वागण्याने भारताने स्वतःचा स्वदेशी संगणक बनवण्याचा निर्णय घेतला.
परम सुपर कॉम्प्युटर ची सुरुवात?
अमेरिकेच्या या वागण्याला उत्तर देण्यासाठी भारताने स्वदेशी सुपर कॉम्प्युटर बनवण्याचा निर्धार केला यासाठी Centre Of Development Advanced Computing (CDAC) ची मार्च १९८८ ला स्थापना केली. याचे प्रमुख हे एक मराठी शास्त्रज्ञ होते त्यांच नाव होतं डॉ. विजय पांडुरंग भाटकर. हेच परम चे आर्किटेक्ट पण होते. त्यावेळचे प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी विजय भाटकर यांना एक प्रश्न विचारला की आपण हे बनवू शकतो का? यावर विजय भाटकर यांनी एक उत्तर दिले की “मी आजपर्यंत तरी सुपर कॉम्प्युटर बघितलं नाही पण मला विश्वास आहे की आपण बनवू शकू”. अशा प्रकारे भारताच्या पहिल्या सुपर संगणकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अन् सन १९९१ साली परम ८००० हा संगणक बनवला गेला.
परम ८००० कार्य प्रणाली:-
पॅरलल प्रोसेसिंग : परम ८००० हा पॅरलल प्रोसेसिंग या प्रणाली वर काम करायचा यात तुम्ही जे पण काम त्याला सांगाल ते तो त्याला छोट्या कामांमध्ये रूपांतरित करायचा आणि मग त्या सर्व कामांना एकाच वेळी करायचा. या पद्धतीमुळे संगणकाला अधिक वेग मिळायचा.
त्याच्या काळातील परम ८००० हा कमालीचा संगणक होता. त्याची काही वैशिष्ट्ये अशी आहेत :- peak performance १.५ gigaflops per second comprised of २५६ इंटेल i८६० प्रॉसेसर जे एकमेकांना एक वेगवान पद्धतीने जोडलेले होते. यामुळे त्यांच्या काम करण्याचा वेग जास्त होता. याच्या मदतीने भारताला आता हवामानाचा अंदाज वर्तवणे सोपे जाऊ लागले. चक्रीवादळे कधी तयार होतील हेही सांगणे सोपे जाऊ लागले.
- AI म्हणजे काय?
- Google Bard म्हणजे काय?| What is Google Bard?
- मत्स्य ६०००: गरज काय समुद्रयान मोहिमेची? | Matsya 6000
भारताकडे सध्या ५ सुपर कॉम्प्युटर आहेत.
त्यांची नावे अशी आहेत:- आयआयएससी बेंगुलुरू
१) परम शिवाय (जगात ७३वा ) पुणे
२) प्रत्युष (जगात १०९वा )
३) SAGA-2 पुणे
४) परम ब्रम्हपुत्रा (जगात १४७वा ) आयआयटी मुंबई
५) ऐरावत (जगात ७५वा ) पुणे
मित्रांनो जर तुम्हाला या वेबसाइटवरील माहिती किंवा ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्की कळवा. तुमच्या परिवारातील सदस्यांना पण नक्की कळवा जेणेकरून त्यांनी याची माहिती होईल. वर नमूद केलेल्या आमच्या सोशल मीडियाला पण नक्की फॉलो करा याने तुम्हाला नवीन पोस्टची माहिती मिळत राहील. किंवा तुम्ही नोटिफिकेशनला पण सब्स्क्राईब करू शकता. जर तुम्हाला पण कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेन्ट करू शकता. मी त्या विषयावर पोस्ट लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद!